बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाची आक्रमक प्रचार निती, सुशांत सिंह राजपूतही प्रचाराचा मुद्दा

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार निती बनविली आहे. बिहारमधील स्थानिक मुद्यांसोबत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू हा निवडणुकीमधील प्रमुख मुद्दा असणार आहे. भाजपच्या कला व संस्कृती कक्षाने सुमारे ३० हजार पोस्टर्स आणि पत्रके छापली आहेत. त्यावर सुशांतचा फोटो छापून त्यावर असंही छापण्यात आलं आहे की, ‘ना भुले है! ना भुलने देंगे!!’


विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार निती बनविली आहे. बिहारमधील स्थानिक मुद्यांसोबत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू हा निवडणुकीमधील प्रमुख मुद्दा असणार आहे.

भाजपच्या कला व संस्कृती कक्षाने सुमारे ३०,००० पोस्टर्स आणि पत्रके छापली आहेत. त्यावर सुशांतचा फोटो छापून त्यावर असंही छापण्यात आलं आहे की, ‘ना भुले है! ना भुलने देंगे!!’

भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी मात्र याबाबत असं म्हटलं आहे की, ‘त्यामध्ये काहीही राजकीय हेतू नाही. हे फक्त दिवंगत अभिनेत्याच्या परिवारापाठी आम्ही एकजूट आहोत हे दर्शविण्यासाठी आहे.’ भाजपच्या कला व सांस्कृतिक कक्षाचे राज्य संयोजक वरुणसिंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना असं म्हटलं की, हे पोस्टर सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी जी मोहीम हाती घेण्यात आली आहे त्याचाच हा एक भाग आहे. सुशांत एक मोठा कलाकार असल्यामुळे सुशांतसोबत आम्ही भावनिकरित्या जोडले गेलो आहोत कारण तो आमच्या राज्यातील होता.’

त्याचबरोबर, हारेगा कोरोना जीतेगा बिहार ही कॅँम्पेन सुरू केली आहे. यामध्ये बिहारमधील आरोग्य सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर चीनी व्हायरसशी कशा पध्दतीने लढा दिला हे सांगितले जाणार आहे. सेवा में तत्पर, बीजेपी निरंतर हे सकारात्मक कॅम्पेन चालू केले जाणार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने शहरापासून गावापर्यंतच्या गरजूंना केलेल्या मदतीची माहिती देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे सरकार आणि आताचे सरकार यामध्ये असलेला फरक दाखविणारे फर्क साफ है हे कॅम्पेनही आहे. न भुला है बिहार, न भुलेगा बिहार या कॅम्पेनद्वारे लालूप्रसाद आणि राबीडी देवी यांच्या काळात बिहारची जी दुरवस्था झाली हे सांगितले जाणार आहे. मदतगार एनडीए सरकारद्वारे भाजपने जनतेसाठी केलेली कामे सांगितली जाणार आहे,

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*