बंगालमध्ये लाज वाचविण्यासाठी कॉंग्रेस अधिर, रिया चक्रवर्तीला म्हटले ‘बंगाली ब्राह्मण महिला’

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात असताना सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड आणि ड्रगीस्ट रिया चक्रवर्तीला बंगाल कॉंग्रेसने ‘बंगाली ब्राह्मण महिला’ म्हटले आहे. बिहारमधील राजकारणात आपल्याला काहीही स्थान उरलेले नाही हे माहित असल्याने किमान बंगालमध्ये तरी आपली लाज वाचविण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या व्होटबॅंकेवर डोळा ठेवून ही रणनिती आखण्यात आली आहे.


वृत्तसंस्था

कोलकाता : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात असताना सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड आणि ड्रगीस्ट रिया चक्रवर्तीला बंगाल कॉंग्रेसने ‘बंगाली ब्राह्मण महिला’ म्हटले आहे. बिहारमधील राजकारणात आपल्याला काहीही स्थान उरलेले नाही हे माहित असल्याने किमान बंगालमध्ये तरी आपली लाज वाचविण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या व्होटबॅंकेवर डोळा ठेवून ही रणनिती आखण्यात आली आहे.

कॉंग्रेसने बंगालमध्ये तख्तपालट केला आहे. खासदार अधीर रंजन चौधरी यांनी प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून नुकतीच जबाबदारी हातात घेतली आहे. मात्र, बंगालमध्ये कॉंग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे. कॉंग्रेसचे अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचे राजकारणही बंगालमध्ये चालत नाही. कारण कट्टर मुस्लिमांची व्होटबॅंक तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे. त्यामुळे किमान आपली लाज राहावी यासाठी ब्राह्मण समाजाच्या व्होटबॅंकेवर कॉंग्रेसचा डोळा आहे.

त्यामुळे अधीर रंजन चौधरी यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिनेत्री तसंच मृत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची बाजू घेतलीय. रियाची बाजू घेतानाच त्यांनी रिया ही ‘बंगाली ब्राह्मण महिला’ असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे. रिया चक्रवर्ती हिचे पिता सेनेचे माजी अधिकारी होते. त्यांनी अनेक वर्ष त्यांनी देशाची सेवा केली परंतु, आपल्या दोन मुलांना मात्र ते न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरत असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.

रियाची अटक भयानक घटना असल्याचे सांगत चौधरी म्हणाले, ‘रिया चक्रवर्तीने कुणालाही आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं नव्हते. तिने कोणताही आर्थिक अपराध केलेला नाही. तिला एनडीपीएस अर्थात नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्स्टन्स अधिनियमानुसार अटक करण्यात आली आहे. त्यामागे राजकारण आहे. मात्र, चौधरी यांच्या या कृतीने बिहारमधील कॉंग्रेसजनांची चांगलीच पंचायत झाली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणावर काय बोलायचे त्यांना समजेनासे झाले आहे.

सुशांतसिंह राजपूत हा भारतीय अभिनेता होता. पण भाजपाने निवडणुकीत फायदा घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकले, अशी टीका त्यांनी केली. पण त्यामुळे बिहारमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*