फ्रान्सने निभावली मैत्री, भारताला दिला सैन्यबळाचा पाठिंबा

राफेल विमान खरेदीवरून कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह कॉँग्रेसने फ्रान्सबद्दल अनेक संशय व्यक्त केले. मात्र, फ्रान्सने भारताशी मैत्री निभावली असून चीनसोबतच्या संघर्षात आपल्या देशाच्या सैन्यबळाचा पाठिंबा भारताला दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीवरून कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह कॉँग्रेसने फ्रान्सबद्दल अनेक संशय व्यक्त केले. मात्र, फ्रान्सने भारताशी मैत्री निभावली असून चीनसोबतच्या संघर्षात आपल्या देशाच्या सैन्यबळाचा पाठिंबा भारताला दिला आहे. भारताला चीनविरुध्दच्या संघर्षात लष्करी पाठिंबा देणारा फ्रान्स हा पहिला देश आहे.

फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून गलवान खोºयात शहीद झालेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त केले. हा हल्ला सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण देशासाठी मोठा धक्का होता. या कठीण काळात आमच्या सहवेदना भारतासोबत आहेत. मित्र म्हणून भारतासाठी सैन्यबळासह सर्व प्रकारचं सहकार्य फ्रान्सकडून केले जाईल. माझ्या सहवेदना संपूर्ण भारतीय सैन्याला आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना कळवाव्या, असं फ्लोरेन्स पार्ली म्हणाल्या.

फ्रान्सकडून भारत राफेलसारखी शक्तीशाली लढाऊ विमाने घेत आहे. यासोबतच फ्रान्स भारताचा एक महत्त्वाचा शस्त्र पुरवठादार देश आहे. राफेलपासून ते स्कोर्पिन सबमरिनपर्यंतचा ताफा फ्रान्सने पुरवला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गेल्या महिन्यातच रशियाला गेले होते आणि मॉस्कोमध्ये त्यांनी भारताला शस्त्र पुरवठा प्रस्तावित वेळेच्या अगोदरच करावा यासाठी विनंतीही केली. फ्रान्सने यापूर्वीच राफेल विमाने एका महिन्याच्या आत भारताला देणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय फ्रान्स आपली एरियल रिफ्युलर्सही तैनात करणार आहे.

फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर विमाने विना थांबा थेट भारतात पोहोचतील. भारतीय वैमानिकांना सध्या फ्रान्समध्ये एरियल रिफ्युलिंगसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*