पुणेकर शिरीष दातेंनी क्षणभर ट्रम्पच्या डोळ्यासमोर “तारे चमकवले”

  • “अमेरिकन जनतेशी तुम्हाला खोटं बोलण्याबद्दल पश्चाताप वाटतो का?”; दातेंचा प्रश्न ट्रम्पनी शिताफीने टाळला.

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : “अमेरिकन जनतेबरोबर तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का?” असा प्रश्न विचारून मूळचे पुण्याचे असलेल्या शिरीष दातेंनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यासमोर क्षणभर “तारे चमकवले.” काही सेकंद विचार करून ट्रम्प यांनी शिताफीने हा अडचणीचा प्रश्न टाळून दुसऱ्या प्रश्नाकडे वळले.

मात्र हा प्रश्न विचारुन पुणेकर शिरीष दाते यांनी सर्वांनाच धक्का दिला. दाते यांच्या या प्रश्नाने व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षात उपस्थित असलेले सगळेच जण काही क्षणासाठी अावाक झाले. भारतीय-अमेरिकन वंशाचे शिरीष दाते मूळचे पुणेकर आहेत. पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला आहे. हफिंगटन पोस्टसाठी ते व्हाइट हाऊस प्रतिनिधी म्हणून काम करतात. “मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षानंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का?” असा प्रश्न दाते यांनी विचारला. त्यांचा हा प्रश्न ट्रम्प यांच्यासाठी प्रचंड अडचणीचा ठरला.

कोण आहेत शिरीष दाते?

सीएनबीसी टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, वॉशिंग्टन स्थित शिरीष दाते मागच्या २५ वर्षांपासून पत्रकारीतेच्या क्षेत्रात आहेत. त्यांच्या लिंकडिन प्रोफाइलनुसार एनपीआर आणि एपी या अमेरिकन माध्यमांसाठी त्यांनी काम केले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स या विषयात दाते यांनी पदवी घेतली आहे. ‘फायनल ऑरबिट’ नावाचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.

व्हाइट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेनंतर दाते यांनी मागच्या पाच वर्षांपासून मला ट्रम्प यांना हा प्रश्न विचारायचा होता असे टि्वट केले आहे. दाते यांनी जो प्रश्न विचारला, त्याबद्दल ट्रम्प यांच्या विरोधकांकडून त्यांचे समर्थन करण्यात येत आहे.

मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षानंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का? असा प्रश्न विचारला. दातेंच्या प्रश्नावर ट्रम्प किंचित अस्वस्थ झाले. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारायला सांगितला. त्यावर दाते यांनी पुन्हा तोच प्रश्न केला. त्यावर ट्रम्प यांनी काहीही प्रतिक्रिया न देता दुसऱ्या पत्रकाराच्या प्रश्नाकडे वळले. ट्रम्प यांच्यासाठी हा प्रसंग अजिबात धक्कादायक नव्हता. कारण यापूर्वी व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदांमध्ये ट्रम्प यांचा पत्रकारांबरोबर अनेकदा वाद झाला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*