पार्थ येणार असला तरी त्याला भाजपामध्ये घेणार नाही, गिरीष बापट यांचे वक्तव्य

शरद पवार यांनी जाहीरपणे फटकारल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोंडी झालेले पार्थ पवार दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. मात्र, पार्थ पवार येणार असले तरी त्याला भाजपामध्ये घेणार नाही, असे भाजपाचे पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी स्पष्ट केले.


विशेष प्रतिनिधी

पुणे : शरद पवार यांनी जाहीरपणे फटकारल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोंडी झालेले पार्थ पवार दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी त्याला पाठिंबाही दिला आहे. मात्र, पार्थ पवार येणार असले तरी त्याला भाजपामध्ये घेणार नाही, असे खासदार गिरीष बापट यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयची चौकशी करण्याची मागणी केली होती. शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार हे अपरिपक्व असल्याचं म्हटलं होते. पार्थ पवार इमॅच्युअर आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी फटकारलं होतं. तेव्हापासून पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा आहे.

त्यानंतर नाराज पार्थ पवार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर गिरीष बापट म्हणाले, पार्थ पवार हे काही भाजपात येतही नाहीत आणि आम्ही त्यांना घेणारही नाही. जो काही आहे त्यांच्या घरातील त्यांचा कौटुबिक प्रश्न आहे. त्यामध्ये आम्ही पडू इच्छित नाही. त्यांनी तो त्यांच्या घरातच सोडवावा. जय श्रीराम असं एकटे पार्थ पवारच म्हणत नाहीत तर संपूर्ण जग म्हणत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*