‘पाडून दाखवा’, सरकारचे हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई? आशिष शेलार यांची टीका

राज्यातील सरकारमधील मंत्र्यांची भांडणे संपायला तयार नाहीत. तीनही पक्षांतील वादही सुरूच आहेत. यामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळच राहिलेला नाही. यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘पाडून दाखवा’, सरकारचे हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?’ असा सवाल त्यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील सरकारमधील मंत्र्यांची भांडणे संपायला तयार नाहीत. तीनही पक्षांतील वादही सुरूच आहे. यामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळच राहिलेला नाही. यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘पाडून दाखवा सरकारचे हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

राज्यात चीनी व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. मात्र, राज्य सरकारला धोरणलकवा झाला आहे. गणेशोत्सव काळात मुंबईत जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकार निष्कारण अडचण करत आहे. यावरून शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले की, ‘कुठलाही ठोस निर्णय नाही, कसले नियोजन, समन्वय नाही, केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वत:चे अपयश झाकण्याचे कौशल या राज्यातील ‘पाडून दाखवा’ सरकारकडे आहे. कोकणात रेल्वे गाड्या सोडण्यावरुन हेच सुरू आहे. रेल्वेची तयारी असतानाही गाड्या राज्य सरकारने सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला.

आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण ऐकले नाही. एसटी वेळेत दिली नाही. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागले. आता परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसलेत. पाडून दाखवा, सरकारचे हे मंत्री आहेत की, भांडखोर सासूबाई?’ अशी टीका शेलार यांनी केली आहे.

राज्यातील मंत्री आणि महाविकास आघीडीचे नेते कोणी विचारले नसताना सरकार पाडून दाखवा, असे म्हणत आहेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते सातत्याने आम्ही एक आहोत, असे सांगत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*