पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण, भारतात महापूर आणण्याचा पाकिस्तान-चीनचा डाव


पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने चीनच्या मदतीने डायमर बाशा हे धरण बांधण्यास सुरूवात केली आहे. या धरणाच्या माध्यमातून काश्मीर आणि लडाखमध्ये महापूर आणण्याचा या दोन्ही देशांचा डाव आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवर कडक शब्दांत टीका केली आहे.


वृत्तसंस्था

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने चीनच्या मदतीने डायमर बाशा हे धरण बांधण्यास सुरूवात केली आहे. या धरणाच्या माध्यमातून काश्मीर आणि लडाखमध्ये महापूर आणण्याचा या दोन्ही देशांचा डाव आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवर कडक शब्दांत टीका केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या या नापाक इराद्यामुळे काश्मीर आणि लडाखचा खूप मोठा भाग पाण्याखाली जाण्याची भीती आहे. काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान या भागावर पाकिस्तानने बळजबरीने कब्जा घेतला आहे. त्यामुळे या भागात कोणतेही काम करणे चुकीचे आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकताच या भागाचा दौरा केला. भारताचा विरोध असूनही या धरणाचे काम सुरू केले आहे. हे धरण २७२ मीटर उंच असून त्यामध्ये ८१ लाख घनफूट पाणीसाठा असणार आहे. २०१९ मध्ये तब्बल ३२ हजार एकरांचे भूसंपादन पाकिस्तानने केले आहे. त्यापैकी ३१, ९७७ एकर गिलगिट बाल्टिस्तान म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील आहे.

पाकिस्तानने या प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेकडे आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यावेळी जागतिक बॅंकेने भारताकडून ना हरकत प्रमाणपत्र आणण्याची अट पाकिस्तानला घातला होती. मात्र, आता भारताबरोबरच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनने या प्रकल्पासाठी पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यास मान्यता दिली आहे. चीन हा भाग पाकिस्तानच्या ताब्यातील मानत असून त्यामुळे पाकिस्तानच्या विकासासाठी मदत देण्यास आपण कटिबध्द असल्याचे म्हणत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था