पंतप्रधान साधणार मध्य प्रदेशातील पथारीवाल्यांशी स्वनिधी संवाद

चीनी व्हायरसमुळे व्यवसायावर परिणाम झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांची उपजीविका पूर्ववत करण्यासाठी भारत सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मध्यप्रदेश येथील पथ विक्रेत्यांशी स्वनिधी संवाद साधणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसमुळे व्यवसायावर परिणाम झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांची उपजीविका पूर्ववत करण्यासाठी भारत सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मध्यप्रदेश येथील पथ विक्रेत्यांशी स्वनिधी संवाद साधणार आहेत.

मध्यप्रदेशामध्ये साडेचार लाख रस्त्यावरील विक्रेत्यांनी (फेरीवाले) आपली नोंदणी केली, चार लाखाहून अधिक विक्रेत्यांना ओळख आणि विक्रेत्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 2.45 लाख पात्र लाभार्थ्यांचे अर्ज पोर्टलमार्फत बँकांना सादर करण्यात आले आहेत, त्यापैकी 1.4 लाख विक्रेत्यांना 140 कोटी रुपये देण्यात आले आहेत. एकूण प्राप्त केलेल्या अर्जांपैकी मध्यप्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. याच राज्यातून 47 टक्के अर्ज येत आहेत.

राज्यातील योजनेच्या लाभार्थींसाठी सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम पाहण्याची सोय 378 नगरपालिकांमधील एलईडी स्क्रीनद्वारे करण्यात आली आहे. हा कार्यक्रम वेबकास्टच्या माध्यमातून प्रदर्शित केला जाणार आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*