पंतप्रधान शुक्रवारी साधणार देशातल्या ग्रामपंचायतींशी संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी  (24 एप्रिल)  देशातल्या विविध  ग्राम पंचायतींशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.  देशात लॉक डाऊन असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत असल्याने सहभाग घेणार्या व्यक्तींशी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे  संवाद साधणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (24 एप्रिल)  देशातल्या विविध  ग्राम  पंचायतींशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

देशात लॉक डाऊन असून सोशल डीस्टन्सिंगचे  पालन करण्यात येत असल्याने सहभाग घेणार्या व्यक्तींशी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधणार आहेत.

यावेळी  पंतप्रधान एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करणार आहेत. एकीकृत पोर्टल हा पंचायत राज मंत्रालयाचा नवा उपक्रम असून, ग्राम पंचायतींना त्यांच्या ग्राम पंचायत विकास आराखड्याची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी सिंगल इंटरफेस पुरवणार आहे.स्वामित्व योजनेचा प्रारंभही पंतप्रधान करणार आहेत.ग्रामीण भागासाठी एकीकृत मालमत्ता प्रमाणीकरण या योजनेद्वारे पुरवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात वसाहती जमिनीची सीमा निश्चिती ड्रोन तंत्रज्ञान या अद्ययावत सर्वेक्षण पद्धतीने करण्यात येईल.

पंचायत राज मंत्रालय, राज्य पंचायत राज विभाग आणि राज्य महसूल विभाग आणि सर्व्हे आॅफ इंडिया यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.

पंचायती राज मंत्रालय दरवषी या कार्यक्रमात, जन हित आणि सेवा प्रदान करण्यात सुधारणा करत  उत्तम कामगिरी करणार्या पंचायत/राज्य/केंद्रशासित प्रदेशांचा गौरव करते. यावर्षी नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्राम सभा पुरस्कार, बाल स्नेही ग्राम पंचायत पुरस्कार,ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार असे तीन पुरस्कार संबंधित राज्य/केंद्र शासित प्रदेशाला दिले जातील.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती