पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांच्या कष्टांना नमन

चीनी व्हायरसच्या संकट काळात देशातील शेतकऱ्यांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपल्या सण-उत्सवांमध्ये रंग भरले जातात. आपल्या अन्नदात्यास शेतकऱ्यांच्या या शक्तीस वेदांमध्ये देखील नमन करण्यात आले आहे. ऋगवेदामध्ये मंत्र आहे, अन्नानां पतये नम:.. क्षेत्राणाम पतये नम:. म्हणजेच अन्नदात्यास नमन आहे, शेतकऱ्यास नमन आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या संकट काळात देशातील शेतकऱ्यांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपल्या सण-उत्सवांमध्ये रंग भरले जातात. आपल्या अन्नदात्यास शेतकऱ्यांच्या या शक्तीस वेदांमध्ये देखील नमन करण्यात आले आहे. ऋगवेदामध्ये मंत्र आहे, अन्नानां पतये नम:.. क्षेत्राणाम पतये नम:. म्हणजेच अन्नदात्यास नमन आहे, शेतकऱ्यास नमन आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातद्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांना नमन करताना ते म्हणाले, आपल्या शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या या कठीण परिस्थितीतही आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. आपल्या देशात यंदा खरीप पिकांची लागवड मागील वर्षीपेक्षा सात टक्के जास्त झाली. डाळींची लागवड जवळपास पाच टक्के व कापसाची लागवड जवळपास तीन टक्के जास्त लागवड झाली आहे. मी यासाठी देशातील शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो, त्यांच्या कष्टांना नमन करतो.

पंतप्रधान म्हणाले, आत्मनिर्भर भारतात खेळणी इंडस्ट्रीला मोठी भूमिका पार पाडायची आहे. असहयोग आंदोलनावेळी गांधीजी म्हटले होते की, भारतीयांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी हे आंदोलन आहे. अगदी तसेच आपल्याला आत्मनिर्भर भारत आंदोलनासाठी करायचे आहे. घरात थांबावे लागणाऱ्या मुलांचा वेळ कसा जाईल? मी कुठेतरी वाचले आहे की खेळण्यांच्या संदर्भात रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की अपूर्ण असलेली खेळणी चांगली आहेत. मुले खेळून तिला पूर्ण करतात. आता मुलांचे आकर्षणाचे केंद्र खेळ नाही तर खेळणी बनले आहे.

महागड्या खेळण्यांमध्ये बनवण्यासाठी-शिकण्यासारखे काहीच नसते. या खेळण्यांमध्ये संपत्तीचे दर्शन होते, मात्र मुलांसाठी यात काही विशेष नसते. मुलांच्या खेळण्यांबाबत राष्ट्रीय शिक्षण धोरणातही सांगण्यात आले आहे. आता देशातील बरीच क्षेत्रे खेळण्यांचे केंद्र म्हणून विकसित होत आहेत. जागतिक खेळणी उद्योग 7 लाख कोटी रुपयांचा आहे, परंतु त्यामध्ये भारताचा वाटा कमी आहे. खेळणे असे असावे ज्याला लहानपण खेळेल देखील आणि खेळवेल सुद्धा. आता कॉम्प्युटर गेम्सचे युग आहे. यापैकी बहुतेक थीम भारतीय आहेत.

चीनी व्हायरसच्या संकटात देशातल्या घराघरात उत्सव आयोजित केले जात आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, लोक स्वत:ची आणि लोकांची काळजी घेत त्यांचे काम करीत आहेत. ज्या प्रकारचा संयम पाळला जात आहे तो अभूतपूर्व आहे. गणेशोत्सव ऑनलाईन पद्धतीने साजरा केला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती बसविण्यात आली आहे.

उत्सवांमध्ये पर्यावरणाचा संदेश लपविलेला असतो तर पर्यावरणासाठी अनेक सण साजरे केले जातात. बिहारच्या थारू समाजाने निसर्गाला जीवनाचा एक भाग बनवले आहे. 60 दिवस बरना उत्सव साजरा करतात. याकाळात कोणीही कोठेही येत-जात नाही. यावेळी ओणम देखील साजरा केला जात आहे. त्याची लोकप्रियता परदेशापर्यंत आहे. हे शेतीशी संबंधित आहे. आपले सण शेतकऱ्यांच्या रंगानेच भरलेले असतात, असे मोदी म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*