पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला “गंदगी भारत छोडो”चा नारा


  • राजघाटावर राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “गंदगी भारत छोडो” चा नारा दिला. त्यांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र (आरएसके)चे उद्घाटन केले. महात्मा गांधी यांना समर्पित राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी १० एप्रिल २०१७ रोजी गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहास १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केली होती. आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत छोडो आंदोलनाची आठवण करून दिली.

मोदी म्हणाले, “भारत छोडोचे हे सर्व संकल्प स्वराज्यपासून सुराज्याच्या भावनेला अनुरुपच आहेत. याच अनुषंगाने आज आपल्या सर्वांना ‘गंदगी भारत छोड़ो’ चा संकल्प देखील पुन्हा करायचा आहे. या आजपासून १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे स्वतंत्रता दिवसापर्यंत देशात एक आठवडा मोठे अभियान राबवू या.” पंतप्रधान मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘गंदगी भारत छोडो’चा यावेळी नारा दिला.

राष्ट्रीय स्वच्छता केंद्रात पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केंद्राचे उद्घाटन केले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजचा दिवस मोठा ऐतिहासिक दिवस आहे. देशाच्या स्वतंत्रता संग्रमात ८ ऑगस्टचे फार मोठे योगदान आहे. आजच्याच दिवशी १९४२ मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी एक विराट जनआंदोलन सुरू झाले होते. इंग्रजांना उद्देशून ”भारत छोडो” चा नारा लगावण्यात आला होता. अशा ऐतिहासिक दिवशी राजघाटाजवळ राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे लोकर्पण हे खरेच प्रासंगिक आहे. हे केंद्र म्हणजे बापूंनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाप्रति १३० कोटी भारतीयांची एकप्रकरे श्रद्धांजली आहे, कार्यांजली आहे.”

बापू, स्वच्छतेमध्ये स्वराज्याचे प्रतिबिंब पाहत होते. ते स्वच्छतेला स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीचा एक मार्ग देखील मानत होते. राष्ट्रीय स्वच्छता केंद्र म्हणजे, गांधीजींचा स्वच्छतेचा आग्रह व त्यासाठी समर्पित कोटी-कोटी भारतीयांच्या विराट संकल्प यांची एका ठिकाणी घातली गेलेली सांगड आहे. थोड्यावेळापूर्वीच या केंद्रात कोट्यावधी भारतीयांच्या प्रयत्नांचे केलेले संकलन पाहून मी त्यांना मनोमन नमन केले.

गांधीजी म्हणत होते की, स्वराज्य केवळ साहसी आणि स्वच्छ जनच आणू शकता. स्वच्छता आणि स्वराज्य यांच्यातील नात्याबद्दल गांधीजी यासाठी आश्वस्त होते कारण, त्यांना विश्वास होता की अस्वच्छता जर सर्वाधिक नुकसान कुणाचं करत असले तर ते म्हणजे गरीबाचं. असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था