पंतप्रधानांच्या `मन की बात`नंतर भारतीय अँप्स प्ले स्टोअरवर टॉप टेनमध्ये

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झालेल्या आपल्या `मन की बात` मध्ये इनोव्हेटिव्ह चॅलेन्जवर भाष्य केल्यानंतर वेगवेगळ्या वर्गवारीत भारतीय मेकच्या अँप्सनी प्ले स्टोअरवरील स्पर्धेत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. नेटकऱ्यांकडून भारतीय अँप्सला चांगली पसंती मिळू लागली आहे.

सोशल वर्गवारीत भारतीय अँप्सनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले त्यात जोश,स्नॅपचॅट,शेअरचँट,मौज,रोपोसो आणि चिंगारी यांचा, शिक्षणाच्या वर्गवारीत(सेगमेंट) नेटकऱ्यांनी जे अँप्स आवड़ले त्यात आप सरकार सेवा,दृष्टी,सरलडाटा,वुट किडस्,कुंटुकी किडस्, पंजाबएज्युकेअर,डाऊबनोट यांना पसंती दिली जात आहे.

आरोग्य आणि व्यायाम(फिटनेस) संदर्भातील भारतीयांनी तयार केलेल्या अँप्समध्ये इतर अँप्सच्या तुलनेत आरोग्य सेतूला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली आहे तर स्टेप्सटूगो,होम वर्कआऊट,ल़ॉस वेट या तर पुरुषांसाठीच्या इन्क्रीज हाइट,वर्कआऊट,सिक्स पॅक इन 30 डेज् यांचा समावेश आहे.

भारतीयांना आवाहन

पंतप्रधान मोदींनी भारतीय संशोधकांना आपल्या भाषणात विशेष आवाहन करत इनोव्हेश चॅलेन्जवरही भाष्य केले. ते म्हणाले, योग्य तपासणीनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या दोन डझन अँप्सची ऑर्डर देण्यात आली आहे. एक अँप आहे कुटुकी किड्स लर्निंग अँप याच्या सहाय्याने मुले गाणे आणि गोष्टीच्या माध्यमानेच गणित,विज्ञान आणि बरेच काही शिकू शकतात. यात वेगवेगळ्या प्रकारच्या अँक्टिव्हिटीज आणि गेम्सदेखील आहेत.

एका अँपचे नाव आहे. Ask सरकार याच्या सहाय्याने आपण चॅट बॉटच्या माध्यमाने इंटरअँक्ट करू शकता आणि कुठल्याही सरकारी योजनेची योग्य माहिती मिळू शकता. भारतीयांनी जास्तीत जास्त चॅलेजंस स्विकारून चांगले संशोधन करावे, नाव कमवावे,असेही आवाहन त्यांनी केले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*