नाशिक टायरबेस मेट्रोला सरकारची `डबलबेल`, भुजबळांना दिला दणका


विशेष प्रतिनिधी

नाशिक : स्वतःची फुशारकी मारत नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रकल्पांचे श्रेय लाटण्याची पालकमंत्री छगन भुजबळांची सवय काही नवीन नाही. नाशिक दत्तक घेणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिक टायरबेस मेट्रो प्रकल्पाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चाल देत या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या भुजबळांना आणि राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला आहे.

निधीची चणचण तसेच अव्यवहार्य प्रकल्पामुळे टायरबेस मेट्रोवर जवळपास फुली बसली असतांना किंबहुना भुजबळ यांनी तसे संकेत दिले असतांना केंद्रीय शहरी विकास व गृहनिर्माण मंत्रालयाच्या त्रुटींची पूर्तता करीत ठाकरे सरकारने या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळावी,असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे फडणवीस यांनी नाशिकमधील विभागीय आयुक्तालयात बैठक घेत टायरबेस मेट्रोची घोषणा केली होती. महापालिका निवडणुकांमध्ये नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर फडणवीस यांनी ठोस काही न केल्याची टिका खोडण्यासाठी मेट्रोचे गाजर दाखवल्याचे बोलले जात होते,मात्र फडणवीस यांनी नुसतीच घोषणा केली नाही तर हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी कंबर कसत महामेट्रो आणि सिडकोकडून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून आपल्या सत्ताकाळात अर्थातच ९ सप्टेंबर २०१९ रोजी मंजुरा दिली.

भुजबळांची आडकाठी घालण्यास सुरवात

या प्रकल्पामध्ये केंद्र शासनाचा मोठा हिस्सा असल्यामुळे तातडीने प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला गेला. केंद्रीय शहरी विकास मंत्रालय त्यास मंजुरी देईल अशी अपेक्षा असतांनाच राज्यांमधून आँक्टोबर २०१९ मध्ये फडणवीस सरकार पायउतार झाले. त्यानंतर हा प्रकल्प गुंडाळला जाईल अशी परिस्थिती असतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रकल्पांची सगळी पूर्तता झाली असतांनाच राज्यातील झालेल्या सत्तांतरामुळे या योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. भुजबळांनी आडकाठी घालण्यास सुरवात केली होती.

नागपूर शहरातील मेट्रो प्रकल्पाता आढावा

नागपूर शहरातील मेट्रो प्रकल्पांच्या अर्धवट कामांमुळे शहरातील वाहतुकीचा पूरता बोजवारा उडाल्याचा दाखला देत शहरातील लोकांच्या गरजा अन्य शहरामधील त्या प्रकल्पांच्या परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले होते. सोबतच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची उपयुक्तता तपासण्याचीही गरज भुजबळ व्यक्त केली होती, भुजबळांनी या प्रकल्पांची व्यवहार्यता तपासण्याची आवश्यकता असल्याचे सांगत याबाबतचा अंतिम निर्णय हा महाविकास आघाडीच्या सरकारकडून घेतला जाईल,असे स्पष्ट केले होते. त्यामुळे महामेट्रोच्या अडचणी वाढत्या होत्या. त्यातच कोरोनाचे संकट असल्याने या प्रकल्पाबाबतची कार्यवाही पूर्णपणे थांबली होती तर केंद्र सरकारनेदेखील या प्रकल्पात त्रुटी काढून त्यांची पूर्तता करण्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले होते,पण आता ठाकरे सरकारने फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे, २७ ऑगस्ट २०२० शहरी विकास व गृहनिर्माण मंत्रालयाला पत्र पाठवून प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी व प्रकल्पाला चालना देण्याची विनंती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भुषण गगरानी यांनी केली आहे. सोबतचा याबाबतच्या त्रुटीची पुर्तता त्यांनी केली आहे.

भुजबळांना जोर का झटका

फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे व पालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याचे सांगत भुजबळांनी या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याची मागणी करत प्रकल्पाची कार्यवाही थांबवली होती, पण या प्रोजेक्टला हिरवा कंदील देऊन ठाकरे सरकारने भुजबळांना जोरदार झटका दिला आहे. नागपूर मेट्रो प्रकल्प अर्धवट असल्याने तेथील वाहतूकीचा बोजवारा उडाल्याचा दाखला भुजबळांनी दिला पण मुख्यमंत्री ठाकरेंची या प्रकल्पाला चाल दिल्याने हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती