नाशिकमध्ये ३५० बेडचे क्रेडाईचे कोविड सेंटर अखेर सेवेत


विशेष प्रतिनिधी

नाशिक : क्रेडाई आणी नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे, या सेंटरमध्ये वैद्यकीय सेवांसह व्यायाम,मनोरंजन,खेळांची सुविधा असेल, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले.

क्रेडाईने तयार केलेले हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचे एक आदर्श मॉडेल आहे. हे सेंटर उभारणीसाठी चित्रकार तसेच परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कार्य कौतुकास्पद आहे. रिक्रिएशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ,पुस्तके,टि.व्ही.यासह मनोरंजनाची तसेच रूग्णांना योगा,मेडिटेसनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचे कोविड सेंटर निर्माण झाले आहे.

सध्या शहरातील हॉस्पिटलमध्ये ८०० बेड रिकामे आहेत. ते बेड संपतील तेव्हा या केअर सेंटरचा वापर करण्यात येईल. रूग्णांची संख्या कमी कशी होईल,यासाठी सगळ्याच घटकांकडून प्रयत्न करण्यात यावेत,असे भुजबळ यांनी आवाहन केले. यावेळी महापौरांसह,आमदार,माजी खासदार आदी उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास आणखी नवीन ठिकाणी जागा बघून प्राथमिक सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात जेणेकरून तेथेही आवश्यकता पडल्यासतातडीने कोविड सेंटर उभारता येणे शक्य होईल,सामाजिक बांधिलकी ठेवून सर्व संस्था,संघटना काम करत आहेत. ते काम सदैव कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी मान्यंवरांनी केले.

करमणूकीसाठी अनेक साधने गाद्या,उशा,ब्लँकेट,पंखे,शौचालय,स्नानासाठी गरम पाणी तसेच पिण्यासाठी आरोची व्यवस्था,करमणूकीसाठी कँरम,चेस,ल्युडोसहित योगा मॅट आहेत. भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र किचन असून सोबतच डायनिंग आहे.डॉक्टर्स,नर्सेस व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आठ वेगवेगळ्या रूम्स तसेच पोलिसांसाठी कंट्रोल रूम,केबिन व दोन बेड असलेली रूमची देखील सोय केलेली आहे.

चाळीस हजार स्केअर फुट सेंटरमध्ये रूग्णांसाठी सर्व आवश्यक सुविधा
२७० बेड पुरुषांसाठी
८०   बेड महिलासाठी
४०   ऑक्सीजन बेड

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था