नागरिकांवर जमावबंदी थोपवणाऱ्या अजित पवारांवरच जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषारोपपत्र

चीनी व्हायरसच्या साथीवर उपाययोजना म्हणजे टाळेबंदी आणि संचारबंदी असे समजून जमावबंदी लादणाऱ्या अजित पवारांवरच जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. मात्र, हे उल्लंघन त्यांनी दोन वर्षांपूर्वी केले होते.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चीनी व्हायरसच्या साथीवर उपाययोजना म्हणजे टाळेबंदी आणि संचारबंदी असे समजून जमावबंदी लादणाऱ्या अजित पवारांवरच जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. मात्र, हे उल्लंघन त्यांनी दोन वर्षांपूर्वी केले होते.

दोन वषार्पूर्वी मुंबईत जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ११ नेत्यांवर न्यायालयात दोषारोप पत्रं दाखल करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही यामध्ये समावेश आहे. ही दोषारोपपत्रं घेण्यासाठी कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईत २०१८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यात आले होते. जमावबंदीचे आदेश असतानाही हे आदेश झुगारून आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे २० ते २५ नेते, कार्यकर्त्यांविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, सचिन अहिर, अशोक धात्रक, सुनील तटकरे, निलेश भोसले, अमित हिंदळेकर, अनिल कदम, किरण गावडे आणि सोहेल सुभेदार यांचा समावेश आहे. न्यायालयीन प्रक्रियेनुसार पोलिसांकडून यासंदर्भात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे.

याप्रकरणाची सुनावणी ३१ ऑगस्ट रोजी शिवडी न्यायालयात आहे. त्या सुनावणीस हजर राहण्यासाठी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यातर्फे या नेते, कार्यकर्त्यांना दोषारोप प्रत घेण्यासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*