नवा विक्रम, नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ सत्तेवरील बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान

देशात मतांच्या पातळीवर अनेक विक्रम रचणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आणखी एक विक्रम नोंदविला आहे. सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसचे पंतप्रधान ठरले आहेत. २६ मे २०१४ रोजी मोदींनी प्रथम पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती त्यानंतर २०१९ मध्येही ते पुन्हा पंतप्रधान झाले. आता ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम मागे टाकत सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसचे पंतप्रधान ठरले आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात मतांच्या पातळीवर अनेक विक्रम रचणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आणखी एक विक्रम नोंदविला आहे. सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसचे पंतप्रधान ठरले आहेत. २६ मे २०१४ रोजी मोदींनी प्रथम पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती त्यानंतर २०१९ मध्येही ते पुन्हा पंतप्रधान झाले. आता ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम मागे टाकत सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसचे पंतप्रधान ठरले आहेत.

वाजपेयी हे आपल्या संपूर्ण कार्यकाळात २,२६८ दिवस देशाच्या पंतप्रधानपदी राहिले होते. वाजपेयी हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले होते. सर्वात प्रथम १९९६ मध्ये वाजपेयी सत्तेवर आले. त्या नंतर १९९८ व १९९९मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

विशेष म्हणजे आपला कार्यकाळ करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते. त्यानंतर आता मोदींनी हा विक्रम मोडला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक १६ वर्षे २८६ दिवस देशाचे नेतृत्त्व केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात तीन विक्रम मोदी यांच्या नावे नोंदले गेले आहेत. रामजन्मभूमीला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. त्यानंतर हनुमान गढीला भेट देणारे तसेच भूमिपूजनाला बसणारेही ते पहिले पंतप्रधान ठरले.

२४ मार्च रोजी त्यांनी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता. ते त्यांचे भाषण देशात टीव्हीच्या इतिहासात सर्वाधिक लोकांनी पाहिलेले भाषण ठरले. मोदी यांच्याव्यतिरीक्त अटलबिहारी वाजपेयी, व्ही. पी. सिंग, एच. डी. देवेगौडा, चंद्रशेखर या बिगर कॉंग्रेसी पंतप्रधानांची कारकिर्द अल्पावधी परंतु, लक्षणीय ठरली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*