दोन विधानांमध्ये दोन नातू आजोबा पवारांनी केले “गारद”

  • “कवडीची किंमत नाही”, सांगून पार्थवर निशाणा; “सीबीआय चौकशीला विरोध नाही”, सांगून आदित्यला घेरले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या इममँच्युअर पार्थ पवारच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, पण सीबीआय चौकशीलही विरोध नाही, असे सांगून शरद पवारांनी एक नव्हे, तर दोन नातू “गारद” केले अाहेत. एक नाव घेऊन आपलाच नातू आणि दुसरा नाव न घेता बाळासाहेब ठाकरे यांचा नातू.

कारण सुशांत प्रकरणात संशयाचे गडद ढग आदित्य ठाकरे यांच्या भोवती फिरताहेत. त्याच बरोबर पार्थ इममँच्युअर आहे. त्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही,” असे सांगून शरद पवारांनी आपल्या कुटुंबातच अजित पवार आणि सुनेत्रा पवारांची “किंमत” कमी करून टाकली आहे. कारण मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थला उमेदवारी देण्यासाठी सुनेत्रा पवारच अतिआग्रही होत्या, अशी खात्रीलायक माहिती होती.

पण पवारांनी आज एवढे blunt विधान करून पार्थ पवारांच्या विषयाला ब्रेकच लावल्याचे मानले जाणे स्वाभाविक आहे. शरद पवारांच्या विधानावर अद्याप अजित पवारांची प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, पार्थ पवारांनी मला काही बोलायचे नाही, असे सांगून सध्या भाष्य टाळले आहे. पण या प्रकरणात अजित पवार आणि सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया नेमकी काय येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

परंतु, काहीही झाले तरी आपल्याच कुटुंबातील एका सदस्याबाबत शरद पवारांनी प्रथमच एवढी blunt प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचे पडसाद कुटुंब आणि राष्ट्रवादीत उमटणार हे निश्चित आहे.

पार्थला कवडीचीही किंमत नसल्याचे ठरवताना शरद पवारांनी बाळासाहेबांच्या नातवाभोवती फिरू शकणाऱ्या सीबीआय चौकशीचा मार्गही मोकळा केल्याचे मानावे लागेल. कारण सीबीआय चौकशी नकोचा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्यचा आहे. परंतु प्रकरण सुप्रिम कोर्टात आहे. तेथे सरकारने सीबीआय चौकशी विरोधात भूमिका घेतल्यानंतर शरद पवारांनी सीबीआय चौकशीला विरोध नसल्याची भूमिका घेणे हा एक प्रकारे आदित्यभोवती फिरू शकणाऱ्या सीबीआय चौकशीला consent देण्याचाच प्रकार असल्याचे मानावे लागेल.

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्याला त्यावेळीच अनिल देशमुखांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. आज खुद्द आजोबा पवारांनी तेच केले. शरद पवार म्हणाले की, “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. सीबीआय चौकशी कोणाला करायची असेल, तर माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर १००% टक्के विश्वास आहे. पण कोणाला सीबीआय चौकशीची मागणी करायची असेल त्यासाठी कोणाचा विरोध नसावा.”

शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. परंतु शरद पवारांच्या वक्तव्यावर कोणतंही भाष्य करण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला यावर काही बोलायचं नाही, असे सांगून पार्थ पवारांनी बाजूला व्हायचा प्रयत्न केला.

… म्हणून पार्थवर शरद पवार नाराज

  •  पार्थ पवार यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला शुभेच्छा पत्र
  •  सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी गृहमंत्र्यांची भेट
  •  पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यात पुढाकार घेतल्याचा राजकीय आरोप
  •  लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार राजकारणात सक्रिय नाहीत.

पार्थवर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या सोशल मीडियातून खिल्ली उडवायलाही सुरवात झाली आहे. “आता यांचाच पक्षातले लोक बोलतात पवारांच वय झालाय त्यांच्या बोलण्याकडे काहीही लक्ष देऊ नका.”

“पार्थ पवार जर इममच्युअर होते तर राष्ट्रवादीने त्यांना निवडणुकिला उमेदवारी का दिली होती ? पार्थ पवारांना राष्ट्रवादी मध्ये युवा नेते म्हणून बघितले जाते, हे विसरू नका.”, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*