देशातील १६ हज हाऊस विलगीकरणासाठी उपलब्ध, मुख्तार अब्बास नक्वी यांचा पुढाकार

केंद्रीय अल्पंसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या पुढाकाराने देशभरातील 16 हज हाऊस राज्य सरकारांना चीनी व्हायरसने बाधित लोकांसाठी विलगीकरण आणि अलगीकरण सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यातून जगभरातील मानवतेसमोर एक उदाहरण दिले गेले असल्याचे नक्वी यांनी सांगितले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय अल्पंसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या पुढाकाराने देशभरातील 16 हज हाऊस राज्य सरकारांना चीनी व्हायरसने बाधित लोकांसाठी विलगीकरण आणि अलगीकरण सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हा कालावाधी भारतासाठी काळजी, वचनबद्धता आणि आत्मविश्वासाचा सकारात्मक काळ असल्याचे सिद्ध झाले आहे. जगभरातील मानवतेसमोर त्यामुळे एक उदाहरण दिले गेले असल्याचे नक्वी यांनी सांगितले.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाने (एनएमडीएफसी) होलि फॅमिली हॉस्पिटल, नवी दिल्ली यांना दिलेली अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधा असलेल्या मोबाईल क्लिनिकचे उद्घाटन करताना नक्वी म्हणाले की, या कालावधीत लोकांच्या आयुष्यात आणि त्यांच्या जीवनशैली आणि कार्य संस्कृतीत महत्त्वपूर्ण बदल झाला आहे.

लोकं आता समाजाप्रती सेवा आणि आपली जबाबदारी पार पडण्यासाठी अधिक वचनबद्ध झाले आहेत. लोकांची उत्कट बांधिलकी व सरकारच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे भारत आरोग्य क्षेत्रामध्ये वेगाने आत्मनिर्भर झाला आहे.

राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक भारतीयांना आरोग्य ओळखपत्र (आयडी) देण्यात येईल.राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणेल. एका व्यक्तीची, प्रत्येक आजाराची, कोणत्या डॉक्टरांनी कोणते औषध दिले याची माहिती तसेच सर्व चाचण्या, अहवाल, ही सर्व माहिती या एका आरोग्य आयडीमध्ये असतील, असे नक्वी यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*