देशातील पहिली किसान रेल बिहारकडे रवाना,रेल्वे, कृषीमंत्र्यांकडून हिरवा झेंडा


विशेष प्रतिनिधी

नाशिक : कृषी व नाशवंत उत्पादनाच्या वाहतुकीसाठी आजपासून देवळाली कॅम्प येथून पहिली किसान रेल सुरु झाली. देवळाली रेल्वेस्थानकापासून बिहारमधील दानापूरपर्यत ही रेल्वे दर शुकवारी धावेल. येथून सुरु होणारी ही पहिलीच किसान पार्सल रेल्वे आहे, कमी भाड्यात मालाची वाहतूक करणारी ही रेल्वे असेल.

कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत सकाळी औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर देवळाली कॅम्प स्थानकातून ही रेल्वे सुटली. दुसऱ्या दिवशी उद्या(ता.८) सायंकाळी पावणेसातला दानापूरला ती पोहचेल. परतीच्या प्रवासात गाडी (००१०८) अप साप्ताहिक किसान रेल्वे ही दर रविवारी दुपारी बाराला दानापूर स्थानकांतून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री पावणेआठला देवळाली कॅम्पला पोहचेल.

या किसान एक्सप्रेसला दहा पार्सल बोगी असून एक लगेच कम ब्रेक व्हॅन असेल. दहा बोग्यांमधून साधारणतः २३० टन माल हा पोहचविला जाणार आहे.
नाशिकचा कांदा,द्राक्ष,डाळींब व भाजीपाल्याला देशभर मागणी असते, आता भाजीपाला देशभरातील बाजारात पोहचवणे शक्य होणार आहे. त्यातून भाव नियंत्रणात येऊ शकतील. याशिवाय पालेभाज्या,भात आणि डाळींबाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात निघते.

त्यामुळे नगदी पिकांवर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून असतात. कांदा,द्राक्ष या उत्पादित मालाच्या जलद वाहतूक आणि विक्री लायक बाजारपेठेसाठी किसान एक्सपेसची अनेक दिवसांपासून मागणी होती, ही रेल्वे सुरु करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे व कृषी मंत्र्यांच्या स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला होता. देशातील हि पहिली किसान रेल सुरु झाल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

३२ तासात एक हजार ५१९ किलोमिटर

किसान रेल ३२ तासांत एक हजार ५१९ किलोमिटर अंतर धावेल. यादरम्यान नाशिकरोड,मनमाड जंक्शन,जळगाव,भुसावळ जंक्शन,बुर्हानपुर,खंडवा,इटारसी,जबलपूर,सतना,कटनी,माणिकपूर,प्रयागराज,पं.दिनदयाळ उपाध्याय जंक्शन आणि बक्सर या स्थानकावर थांबणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती