दिल्ली दंगलीमागचे षडयंत्र उघड होणारच, ब्ल्युम्सबेरी नाही तर गरुडा प्रकाशन प्रसिध्द करणार दिल्ली दंगलीची ‘अनफोल्ड स्टोरी‘

दिल्ली दंगलीमागे असलेल्या षडयंत्राला उघड करणारे दिली रायटस २०२०: द अनफोल्ड स्टोरी हे पुस्तक प्रकाशन करण्यास ब्ल्युम्सबेरी प्रकाशनाने नकार दिल्यावर गरुडा प्रकाशनाने ते प्रसिध्द करण्याची तयारी दर्शविली आहे. दिल्ली दंगलीमागे कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी तब्बल १५ हजार जणांनी पुस्तकखरेदीसाठी प्रकाशनपूर्व नोंदणी केली आहे. दिल्लीत झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप पुस्तकाच्या लेखकांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीमागे असलेल्या षडयंत्राला उघड करणारे दिली रायटस २०२०: द अनफोल्ड स्टोरी हे पुस्तक प्रकाशन करण्यास ब्ल्युम्सबेरी प्रकाशनाने नकार दिल्यावर गरुडा प्रकाशनाने ते प्रसिध्द करण्याची तयारी दर्शविली आहे. दिल्ली दंगलीमागे कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी तब्बल १५ हजार जणांनी पुस्तक खरेदीसाठी प्रकाशनपूर्व नोंदणी केली आहे. दिल्लीत झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप पुस्तकाच्या लेखकांनी केला आहे.

दिल्लीत फेब्रुवारी मध्ये झालेल्या दंगलीवर आधारीत दिल्ली राइटस् 2020 : द अनटोल्ड स्टोरी हे पुस्तक ब्ल्यूमसबेरी प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार होते. मोनिका अरोरा, सोनली चितळकर आणि प्रेरणा म्हलोत्रा या पुस्तकाच्या लेखिका आहेत. मात्र, तथाकथित पुरोगाम्यांच्या धमक्यांना घाबरून ब्ल्यूमसबेरीने ते मागे घेतले. त्यानंतर गरुडा प्रकाशन पुढे आले असून त्यांना १५ हजार जणांनी प्रकाशनपूर्व खरेदीसाठी नोंदणी केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी तर हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ज्यांनी या पुस्तकाच्या वितरणाला विरोध दर्शवला आहे, त्यांना देशाच्या जनतेनं योग्य उत्तर दिलं आहे, प्रकाशकांना कोणतीही कल्पना न देता या पुस्तकासंदर्भात एक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे प्रमुख भारतीय जनता पक्षाचे नेते कपिल मिश्रा हे होते. मात्र त्यानंतर ब्लुम्सबरीने हे पुस्तक प्रकाशित करण्याला नकार दिला होता. आता हे पुस्तक गरूड प्रकाशनातर्फे प्रकाशित केलं जाणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*