दार उघड उध्दवा,दार उघड! नाशिकमध्ये मंदीराची दारे उघडण्यासाठी राज्यव्यापी घंटानाद

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोनामुळे पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे कुलूपबंद आहेत. त्यामुळे भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन,भजन,पूजन करणे अवघड झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेतर्फे `दार उघड उध्दवा,दार उघड~ अशी हाक देण्यात येत आहे, त्यानुसार आज राज्यभर घंटानाद करण्यात येत आहे, त्यानुसार नाशिक व त्र्यंबकेश्वरला घंटानाद झाला.

अठरा मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत. श्रावणही विनापूजा,दर्शनाचा गेला. आता पितरांच्या आठवणींचा भाद्रपदाचा पितृपक्ष दोन सप्टेंबरपासून सुरु होत आहे. एकीकडे कोरोना महामारीचे रूग्ण वाढत आहेत तर दुसरीकडे लोकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने उपासमारीने लोक मरण्याची वेळ आली आहे. त्याबाबत राज्य सरकार संभ्रमित असून कुठलाही ठोस निर्णय घेत नसल्याने जागे करण्यासाठी शनिवारी(ता.२९) कपालेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातच घंटानाद आंदोलन झाले.


हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

कोरोनामुळे पाच महिन्यापासून भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन,भजन,पूजन करणे अवघडझाले आहे, त्यापार्श्वभूमीवर शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राम्हण संस्थेच्या कार्यायात हिंदुत्वादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी पत्रकार परिषदेत हा इशरा दिला होता. यावेळी आमदार देवयानी फरांदे,अंड.राहुल ढिकले,भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे, महंत भक्तीचरणदास,महंत सुधीरदास पुजारी,कपिलधारा तीर्थाचे महंत फलहारी महाराज,वारकरी महामंडळाचे अध्यक्ष धर्मचार्य निवृत्ती महाराज रायते,रामसिंग बावरी,बजरंग दलाचे विनोद थोरात, अँड.भानुदास शौचे आदींसह धार्मिक संस्थानचे अध्यक्ष तसेच विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दार उघड उध्दवा,दार उघड

धार्मिक आध्यात्मिक संघटना, संस्था,प्रमुख देवस्थानचे अध्यक्ष,विश्वस्त,विविध पंथ संप्रदायाच्या प्रमुख धर्माचार्य संत महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व मंदिरांसमोर दार उघड उध्दवा, दार उघड अशी हाक देण्यात येत आहे. सरकारने मठ-मंदिरे,धार्मिक स्थळे उघड्याची परवानगी देणे गरजेचे आहे, पण ठाकरे सरकार मॉल,मांस, दारूची दुकाने सुरु करण्यात स्वारस्य दाखवित असलेतरी,धार्मिक स्थळे खुली करण्याकडे कानाडोळा करत असल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन झाले

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*