विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन येणे गंभीर बाब आहे. पण नाथाभाऊंना दाऊदच्या बायकोने फोन करण्याइतका गंमतीशीर विषय देखील नाही. याची गंभीरता ओळखून याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रीला धमकीचे फोन येत असतील तर या इतकी गंभीर बाब कोणतीच असू शकत नाही, सोबतच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना देखील धमकीचा फोन येणे गंभीर आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांना जर धमकी देण्याचे धारिष्ट कोणी करत असेल,तर निश्चितच राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेला हे एक प्रकारचे आव्हान आबे, त्यामुळे सरकारसमोर देखील फोन करणार कोण आहे, त्याचा शोध घेण्याचे एक आव्हान आहे.फोन नेमका कोणत्या कारणासाठी केला असावा, याची गंभीरता हे सारे समाजासमोर लवकर यायला हवे,असेही खडसे म्हणाले.
खोडकरपणा करण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांना अशाप्रकारे फोन येणे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. यातील तथ्य शोधले जायलाच हवे,पण खरंतर हा खोडकरपणा करण्याचा प्रयत्न असावा, तरीदेखील हा प्रकार इतक्यात घेता येणार नाही. कारण दाऊदच्या बायकोने नाथाभाऊंना फोन केल्यासारखा गंमतीचा विषय नाही. त्यात गंभीरता असेल, त्याची खात्री करणे गरजेचे असल्याचे खडसे म्हणाले,