तुम्ही आणि तुमच्या आईने चीनकडून पैसे घेतले, जे.पी.नड्डा यांचा राहूल गांधींवर आरोप

तुम्ही आणि तुमच्या आईने राष्ट्राचं काय हित केलं? उलट चीनकडून पैसे घेतले आता आणखी किती खालच्या पातळीवर जाल असा सवाल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तुम्ही आणि तुमच्या आईने राष्ट्राचं काय हित केलं? उलट चीनकडून पैसे घेतले आता आणखी किती खालच्या पातळीवर जाल असा सवाल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कॉंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना केला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारतीय जनता पक्षावर सातत्याने टीका करत आहेत. त्यांनी सोमवारी एक बातमी ट्विट करुन माहितीच्या अधिकारात पीएम केअर्स फंडाची माहिती देण्यास नकार असा एक संदेशही लिहिला. यावर ट्विटद्वारे नड्डा यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, प्रिन्स ऑफ इनकॉम्पिटन्स आर्टिकल्सने न वाचताच काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

तुमची कारकीर्द पूर्णत: चुकीच्या बातम्या पसरवण्यात वाया घालवली. तुमच्याकडे असलेली संपत्ती तुम्ही चीनकडून घेतली आहे. तुम्ही आणि तुमच्या आईने राष्ट्राचं काय हित केलं? उलट चीनकडून पैसे घेतले आता आणखी किती खालच्या पातळीवर जाल?

पीएम केअरबाबत राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपावर नड्डा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या या उपक्रमावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. ‘पराभूत झालेले तुमच्या सारखे लोक केवळ खोट्या बातम्या पसरवू शकतात. कोरोनाविरोधी लढाईत संपूर्ण देश एकजूट झाला आहे. पण चीनकडून पैसे घेऊन तुम्ही आणि तुमच्या आईने तर देशहिताला ठेच पोहोचवली आहे. तुम्ही पैसे घेतले आहेत. आपल्या घराण्यातील संशयास्पद वारशामध्ये पीएमएनआरएफकडून पैसे वळवण्याचा देखील समावेश आहे.

राहुल गांधी संरक्षण समितीच्या बैठकांना हजर राहत नसल्याबद्दलही नड्डा यांनी टीका केली होती. ते म्हणाले होते की, राहुल गांधी हे एक गौरवशाली वंश परंपरेशी जोडले आहेत, तेथे समितीला काही महत्त्व नसते. काँग्रेसमध्ये असे अनेक सदस्य आहेत, ज्यांना संसदीय प्रकरणांची चांगली जाण आहे. मात्र, एक राजवंश अशा नेत्यांना कधी पुढे येऊ देत नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*