“तारीख नही बताएंगे”च्या टिंगलखोरांना उत्तर मिळालंय; अनेकांच्या नाकावर टिच्चून राम मंदिर उभारतेय : देवेंद्र फडणवीस


  • फडणवीसांनी जागविल्या कारसेवेच्या आठवणी; अलाहाबादवरून अयोध्येला चालत जात असताना आमच्यावर लाठीमार झाला 

वृत्तसंस्था

मुंबई : मी कारसेवक असताना अनेक मित्र राममंदिराच्या मुद्द्यावरून आमची टवाळी करायचे. परंतु, या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून आता राममंदिर उभे राहत आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला मुंबई भाजपच्यावतीने दादर येथील पक्ष कार्यालयात गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलनातील आपले अनुभव सगळ्यांसमोर मांडले.

फडणवीस यांनी म्हटले की, आज मी एक कारसेवक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित आहे. १८-१९ वर्षांचा असताना मी राम शिलापूजनचा कार्यक्रम हाती घेतला होता. कारसेवक म्हणून मीही त्यावेळी गेलो होतो. अलाहाबादवरून अयोध्येला चालत जात असताना आमच्यावर लाठीमार झाला आणि दूरवर बदायूंमध्ये जेलमध्ये टाकले तीनवेळा कारसेवा झाली. तिन्ही वेळा मी सहभागी झालो होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

त्यावेळी आमचे अनेक मित्र पेपरमध्ये लिहीत होते. ‘मंदिर बनायेंगे, लेकीन तारीख नहीं बतायेंगे’ अशाप्रकारे ते आमची टिंगल करायचे. मात्र, आज सगळ्यांच्या नाकावर टिच्चून राममंदिर उभारले जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था