तळागाळात काँग्रेस पोहोचविण्याचा संदेश देऊन नेते निघून गेले घरघर लागलेल्या काँग्रेसला वाढविण्यासाठी नेत्यांचा कार्यकर्त्यांना डोस

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्यातील आपआपसातील अंतर्गत मतभेद, स्थानिक पातळीवर नियोजनशून्य कारभार आणि महाआघाडीचे सरकार असूनही ठोस कामांपासून वंचित राहणारे कॉग्रेस कार्यकर्ते,पदाधिकारी सध्या वैतागले आहे. याच कार्यकर्त्यांचा हूरूप वाढविण्यासाठी साधारणतः पंधरा दिवसापुर्वी कॉग्रेसचे जेष्ठ नेते,मंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाशिक दौऱ्यावर येऊन कार्यकर्त्यांना आपआपसातील मतभेद दूर करत कॉग्रेस वाढविण्याचा सल्ला दिला होता. त्याचीच री ओढत काल झालेलेल्या मेळाव्यात जेष्ठ नेते मुझफ्फर हुसेन यांनी तळागाळात जाऊन कॉग्रेस वाढविण्याचा सल्ला देत ते निघून गेले.

पक्षाचा संघटनात्मक विस्तार व आढावा यासाठी श्री.हुसेन यांनी दोन दिवसांचा नाशिक जिल्हा दौरा केला. यावेळी नांदगाव येथे त्यांची बैठक झाली. यावेळी संघटनात्मक पातळीवरही चरचा झाली. आढावा बैठकीत ते म्हणाले, संघटना मजबूत करायची असेल तर तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यत पोहचा. त्यांना सत्तेचा लाभ मिळवून द्या. पक्षासाठी कार्यकर्ता महत्वाचा असतो. सर्वसामान्य कार्यकर्त्यांला बळ दिल्यास संघटना वाढते. त्यातून पक्ष बळकट होतो. सत्तेच्या नजिक पोहचतो. सत्तेचा उपयोग सर्वसामान्य जनतेचे मुललभूत प्रश्न सोडविण्यासाठी गरजेचे आहे.

महाराष्ट्रात प्रतिगामी व देशातील संविधानिक चौकट मोडन गरीब,तळातील घटकांना उद्वस्त करणारा विचार सत्तेवर येण्यापासून रोखण्यात कॉग्रेस पक्षने मोठी भूमिका पार पाडली आहे, असे नमूद करून हुसेन म्हणाले, आज महाराष्ट्रातील सत्तेत कॉग्रेस एक घटक पक्ष आहे. या सत्तेचा उपयोग सामान्य जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे. त्यात गावपातळीपर्यतच्या कार्यकर्त्या हाच महत्वाचे माध्यम आहे. हे महत्व प्रत्येकाने ओळखावे, यानिमित्ताने कॉग्रेस,पक्ष नेत्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणावी, लोकांमध्ये रूजवावी असे सांगायला ते हुसेन विसरले नाही. राज्यात सत्तेत सहभागी असतांना कॉग्रेसला उत्तर महाराष्ट्रात लागलेली घरघर कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांसाठी विचारमंथन करायला लावणारी आहे असे वाटते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*