ड्रग नेटवर्कची तक्रार करूनही कारवाई नाही, आशिष शेलार यांचा आरोप

वांद्रे वरळी सी-लिंक जवळील वस्ती व वांद्रे रिक्लेमेशनच्या परिसरात कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ड्रग्स नेटवर्कच्या तक्रारीबद्दल पोलीस आयुक्त तसेच अँटी नार्कोटिक्स सेलला १४ मार्च रोजी मी पत्र लिहिले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही किंवा कारवाई झाली असल्यास त्याबाबत मला कल्पना दिली गेलेली नाही, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वांद्रे वरळी सी-लिंक जवळील वस्ती व वांद्रे रिक्लेमेशनच्या परिसरात कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ड्रग्स नेटवर्कच्या तक्रारीबद्दल पोलीस आयुक्त तसेच अँटी नार्कोटिक्स सेलला १४ मार्च रोजी मी पत्र लिहिले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही किंवा कारवाई झाली असल्यास त्याबाबत मला कल्पना दिली गेलेली नाही, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात चर्चेत आलेल्या ‘ड्रग्ज, पब आणि पार्टी’ कल्चरचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात असल्याचा दावा अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून त्यांनी या ठिकाणांवर धडक कारवाईची मागणी केली आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूडमधील त्याच्या मित्रांची चौकशी सुरू आहे. त्यातून बॉलिवूडमधील अनेक मंडळींकडून अमली पदार्थांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शेलार यांनी पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहिलं आहे. ‘मुंबई आणि विशेषत: माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील बेकायदा अंमली पदार्थांच्या समस्येसंदर्भात मी सातत्याने पोलिसांचे लक्ष वेधत आहे.

यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. ड्रग्जच्या व्यसनामुळे देशातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून मादक पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित घटकांचा थेट संबंध भारताविरुद्ध काम करणाऱ्या परदेशी शक्तीशी आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि देशाच्या करमणूक उद्योगाचे मुख्य केंद्र असल्याने या राष्ट्रविरोधी दहशतवादी संघटनांचे मुंबईवर मुख्य लक्ष्य आहे. माज्या वांद्रे, खार, सांताक्रूझ या मतदारसंघात अनेक पब, बार आणि रेस्टॉरंट्स आहेत, जे कायद्यांचे किंवा नियमांचे उल्लंघन करीत असून संबंधित यंत्रणांचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.

या पब पैकी बऱ्याच जणांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे आणि परवानगी दिलेल्या वेळेच्या पलीकडे अनियंत्रित नाइटलाइफ पार्ट्या सुरू असतात. हीच ठिकाणे दुदैर्वाने बेकायदेशीर ड्रगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. पोलिस आणि महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने हे सारे राजरोसपणे सुरू आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*