टिक टॉक, यूसी ब्राऊझरसह ५९ चीनी ऍपवर भारतात बंदी

  • देशाच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रातील मोदी सरकारने टिक टॉक सह ५९ ऍपवर भारतात संपूर्ण बंदी घालण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हा निर्णय जाहीर करून देशात बंदी घालण्यात आलेल्या ऍपची यादी जारी केली आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकांच्या खासगी आयुष्यातल्या सुरक्षेला या ऍपमुळे धोका असल्याचे माहिती प्रसारण खात्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

वास्तविक चीनी applications मधून हार्डवेअरमध्ये घुसखोरीचा चीनी कंपन्या प्रयत्न करत असल्याचा आरोप अनेक देशांचा आहे. त्यामुळे चीनकडून 5G तंत्र घेण्यास अनेक देशांचा नकार आहे.

 

त्याच बरोबर ही बाबही येथे महत्त्वाची आहे, की चीनी ऍपवर बंदी घालण्याचा विषय १५ जूनच्या गलवान हिंसक संघर्षाच्या आधीपासून मोदी सरकारच्या विचाराधीन होता.

हिंसक संघर्षानंतर त्याला वेग आला. वरिष्ठ पातळीवर दीर्घ विचार विनिमय झाला. आणि आज सायंकाळी चीनी ऍपवर बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. सर्व मोबाईल कंपन्यांना हा बंदीचा आदेश पाठविण्यात आला आहे. या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल.

टिक टॉक बरोबर शेअरइट, बायडू मँप, ट्रान्सलेटर, झेंडर वेईबो आदी एँपवर बंदी घालण्यात आली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*