झेंडा मागे दिसतोय मग मुख्यमंत्री सॅल्यूट कोणाला मारताहेत? निलेश राणे यांचा सवाल

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनीच्या ध्वजवंदनाचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर चांगलीच टीका होऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी, झेंडा मागे दिसतोय मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सॅल्युट कोणाला मारत आहेत, सीबीआय दिसली की काय? असा खोचक सवाल केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनाचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर चांगलीच टीका होऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी, झेंडा मागे दिसतोय मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सॅल्युट कोणाला मारत आहेत, सीबीआय दिसली की का? असा खोचक सवाल केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांच्या ध्वजारोहणाच्या फोटोवरुन निलेश राणे यांनी त्यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहणाचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने सध्या राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणामध्ये उध्दव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नावही घेतले जात आहे. आदित्य ठाकरे यांचे मित्र असल्याने चित्रपट निर्माते करण जोहर यांची चौकशी झाली नाही. त्याचबरोबर सुशांत सिंह याची मॅनेजर दिशा सॅलीयन हिच्या आत्महत्या प्रकरणाचीही चर्चा आहे.

दिशा सॅलीयनने आत्महत्या केली त्या दिवशी तिच्या घरी पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये महाविकास आघाडीचा एक नेता सहभागी झाला होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र पोलीस तयार नाहीत. महाविकास आघाडीनेही हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनविला आहे. त्यामुळेच राणे यांनी हा टोला लगावला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*