झारखंडच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतला अकरावीला प्रवेश

केवळ १० वी पास असलेल्या व्यक्तीला शिक्षण मंत्री करण्याचा पराक्रम झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा-कॉंग्रेस आघाडी सरकारने केला आहे. यामुळे सरकार आणि शिक्षणमंत्री जगन्नाथ महातो यांच्यावर होत असलेल्या प्रचंड टीकेमुळे महातो यांनी ११ वीसाठी प्रवेश घेतला आहे.


विशेष प्रतिनिधी 

रांची : केवळ १० वी पास असलेल्या व्यक्तीला शिक्षण मंत्री करण्याचा पराक्रम झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा -कॉंग्रेस आघाडी सरकारने केला आहे. यामुळे सरकार आणि शिक्षणमंत्री जगन्नाथ महातो यांच्यावर होत असलेल्या प्रचंड टीकेमुळे महातो यांनी ११ वीसाठी प्रवेश घेतला आहे.

महातो हे डुमरी या मतदारसंघातून निवडून आले आहेत. राज्यातील आघाडी सरकारच्या अपरिहार्यतेतून महातो यांना शिक्षण मंत्री म्हणून नेमले गेले. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी आणि नागरिकांकडून प्रचंड टीका होत आहे. त्यामुळे आता महातो यांनी बोकारो नावाडीह येथील देवी महातो इंटर कॉलेजात प्रवेश घेतला आहे.

याबाबत महातो म्हणाले की मी दहावी पास असल्यामुळे माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यामुळे मला खूप वाईट वाटले. म्हणूनच मी पुन्हा अकरावीला प्रवेश घेतला आहे. दहावीमध्ये मला सेकंड क्लास मिळाला होता. मात्र,राजकारणात सक्रीय झाल्यामुळे पुढील शिक्षण घेतले नाही.

झारखंड हे आदिवासी राज्य समजले जाते. मात्र, तरीही येथील एकही शिक्षण मंत्री अद्यापपर्यंत पदवीपेक्षा कमी शिकलेला नव्हता. मात्र, विद्यमान सरकारने दहावी पास असलेल्या महातो यांना थेट शिक्षण मंत्री करण्याचा चमत्कार घडविला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*