ज्वलंत हिंदुत्वाची बेगडी धर्मनिरपेक्षतेवर मात हेच काँग्रेसच्या घसरणीचे खरे कारण

हिंदूंच्या भावना दुखवून मुसलमानांचे लांगुलचालन काँग्रेसच्या मूळावर; संजय राऊतांची परखड टीका


वृत्तसंस्था

मुंबई : ज्वलंत हिंदुत्वाने बेगडी धर्मनिरपेक्षतेवर मात केली. देशातील बहुसंख्य हिंदूंच्या भावना सतत दुखावून मुसलमानांचे लांगुलचालन केले ते काँग्रेसच्या मूळावर आले, अशी परखड टीका खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून केली.

 

 • यात राऊत म्हणतात : मोठमोठ्या वादळांमध्ये काँग्रेस टिकून राहिली. पण आजच्या वादळात पडझड होण्याइतपतही काँग्रेस देशात कोठे उरलेली नाही. दलित, मुसलमानांची २२% मतपेढी काँग्रेस पासून दुरावली आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व जातीधर्मांचे लोक मतदान करतात. भाजप – शिवसेना या पक्षांना मुसलमानांचे मतदान होते. हे समजून घेतले पाहिजे. ज्वलंत हिंदुत्वाने बेगडी धर्मनिरपेक्षतेवर मात केली आहे, हेच काँग्रेस दिशाहीन आणि नेतृत्वहीन होण्याचे खरे मुख्य कारण आहे.
 • काँग्रेसमध्ये गांधी घराणे सोडून कोणी नेतृत्व करावे हा विचार चांगला आहे. पण त्या क्षमतेचा नेता कोणी दिसत नाही.
 • देश पातळीवर काँग्रेस संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर उभे राहील असे नेतृत्व दूर दूरपर्यंत कोठे दिसत नाही.
 • ममता बँनर्जी, शरद पवार, चंद्रशेखर राव आदी नेत्यांनी काँग्रेसचीच ताकद शोषून घेऊन आपले पक्ष वाढविले.
 • मोदी सरकार अनेक उद्योगपतींना नियमबाह्य पद्धतीने लाभ पोहोचवत असल्याचा आरोप राहुल गांधी हे सातत्याने करत असतात. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ‘कॉर्पोरेट’ लॉबीने काँग्रेस पक्ष गांधीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.
 • सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडतील व त्यानंतर सामुदायिक नेतृत्त्व म्हणून हे ‘पत्रलेखक’ काँग्रेसवर ताबा मिळवतील हे सर्व भाजपला हवेच होते. संपूर्ण देश काँग्रेसमुक्त व्हावा, हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप व कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले. राहुल गांधी हे सतत सरकारच्या व्यवहारांवर टीका करत आहेत. अनेक उद्योगपतींना मोदी सरकारने नियमबाह्य पद्धतीने लाभ पोहोचवल्याचा आरोपही राहुल गांधी करत असतात. यामुळे अस्वस्थ झालेल्या कॉर्पोरेट लॉबीनेच काँग्रेस गांधीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*