जनता चीनी मालावर बहिष्कार टाकतेय; पण ठाकरे सरकारला मोह सुटेना


मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचे ढोल पिटण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकार चीनी कंपन्यांनी केलेले करार रद्द करण्यास तयार नाही. हे गुंतवणूक करार सध्या ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एका बाजुला जनता चीनी मालावर बहिष्कार टाकत असताना सरकारला मात्र मोह सुटेना झाला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचे ढोल पिटण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकार चीनी कंपन्यांनी केलेले करार रद्द करण्यास तयार नाही. हे गुंतवणूक करार सध्या ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एका बाजुला जनता चीनी मालावर बहिष्कार टाकत असताना सरकारला मात्र मोहन सुटेना झाला आहे.

चीनी व्हायरसच्या संकटामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यामुळे राज्याचे उत्पन्न कमी झाले आहे. या परिस्थितीत ठाकरे सरकारने मागील फडणवीस सरकारच्या काळातीलच ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा कार्यक्रम घेतला. राज्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी १२ कंपन्यांसमवेत १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले होते.

यामध्ये चीनमधील हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन चिनी कंपन्यांशी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे करार केले होते. हे करार सध्या जैसे थे ठेवण्यात येणार आहेत. केंद्र सरकारशी चर्चा करून याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

सरकारने तिन्ही चिनी कंपन्यांसोबतचे सामंजस्य करार तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असे देसाई यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था