चीनी व्हायरस रोखण्यात अपयश, औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा

औरंगाबाद शहरात दररोज चीनी व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी दोनशेहून अधिक रुग्ण वाढले असून एकट्या बजाज ऑटो कंपनीत ७९ नवे बाधित आढळले आहेत. शहरात रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. याला जबाबदार कोण असा जाब विचारत मनसे कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयात राडा केला.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद शहरात दररोज चीनी व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी दोनशेहून अधिक रुग्ण वाढले असून एकट्या बजाज ऑटो कंपनीत ७९ नवे बाधित आढळले आहेत. शहरात रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. याला जबाबदार कोण असा जाब विचारत मनसे कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयात राडा केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या शिष्टमंडळाची भेट अतिरीक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी निकम यांच्या अंगावर खुर्ची उगारली. त्यामुळे काही वेळ निकम यांच्या दालनात तणाव निर्माण झाला होता.


औरंगाबादमध्ये चीनी व्हायरसला रोखण्यात प्रशासनाला पूर्ण अपयश आले असल्याचा आरोप मनसेने केला आहे. महानगरपालिका प्रशासन चीनी व्हायरसशी लढताना अनेक संवेदनशील बाबीवर अक्षम्य दुर्लक्ष, हलगर्जीपणा करीत आहे. तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

कामावर रुजू होऊन जवळपास 3 महिन्याचा कालावधी होऊनही या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देण्यात आलेले नाही. हे डॉक्टर कोव्हीड सेंटर वर प्रत्यक्ष रूणांचे कोव्हीड चाचणी करतात. महापालिकेचे स्थायी स्वरूपात नियुक्त असलेले एकही डॉक्टर हे काम करत नाहीत. या शिवाय आशा वर्कर आणि आरोग्य विभागातील रोजंदारी महिला कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हे करतात. मात्र स्थायी अधिकारी काहीच करतांना दिसत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*