चीनी व्हायरसला रोखण्यासाठी ‘पवित्रपट्टी’ मास्क

चीनी व्हायरसला रोखण्यासाठी मास्क परिधान करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, मास्कच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी) या संस्थेने आयुर्वेदावर आधारित बायोडिग्रेडेबल फेस मास्कचे नॅनोफायबर्स विकसित केले असून विषाणूंना निष्क्रिय करण्याचे काम करतात. त्यांना पवित्रपट्टी असे नाव देण्यात आले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : चीनी व्हायरसला रोखण्यासाठी मास्क परिधान करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, मास्कच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी) या संस्थेने आयुर्वेदावर आधारित बायोडिग्रेडेबल फेस मास्कचे नॅनोफायबर्स विकसित केले असून विषाणूंना निष्क्रिय करण्याचे काम करतात. त्यांना पवित्रपट्टी असे नाव देण्यात आले आहे.

कोविड 19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी या उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष निर्मिती करण्यासाठी पुण्याची डीआयएटी आणि कोल्हापूरच्या सिद्धेश्वर टेक्स्टाईल्स प्रा. लि. या कंपनीदरम्यान तंत्रज्ञान हस्तांतरण करार करण्यात आला आहे. या कंपनीने आता पवित्रपट्टी नावाचा आपला पहिला आयुर्वेदिक बायोडिग्रेडेबल फेस मास्क बाजारात विक्रीसाठी आणला आहे. कंपनीने सुरुवातीला 10,000 मास्क तयार केले असून वितरक, विक्री प्रतिनिधी आणि औषधनिर्मिती कंपन्यांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच हे मास्क आता अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ई कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातूनही उपलब्ध होणार आहेत.

सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेवून बहुतांश लोक सेंद्रिय उत्पादनाची मागणी करताना दिसत आहे. सेंद्रिय उत्पादनाला केवळ भारतामध्येच नाही तर जागतिक स्तरावर सातत्याने मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. निरोगी शरीरासाठी सुरक्षित अन्नधान्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे शेतामध्ये रसायनांचा, रसायनिक खतांचा वापर करणे टाळून सेंद्रिय शेत करण्यास सिद्ध असलेल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने चांगल्या संधी निर्माण होत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*