चीनी व्हायरसचा बरे होण्याचा दर ५५.४९ टक्के


देशातील लॉकडाऊनबाबत अद्यापही प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, या लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय सुविधा उभारण्यात आलेल्या यशामुळे चीनी व्हायरसच्या रुग्णांना उपचार मिळू शकले. यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ५५.४९ टक्के इतका झाला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : देशातील लॉकडाऊनबाबत अद्यापही प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, या लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय सुविधा उभारण्यात आलेल्या यशामुळे चीनी व्हायरसच्या रुग्णांना उपचार मिळू शकले. यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ५५.४९ टक्के इतका झाला आहे.

सध्या देशातील रुग्णांची संख्या चार लाखांच्या घरात असली तरी त्यातील तब्बल २ लाख ३० हजार रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या देशात १ लाख ७० हजार सक्रीय रुग्ण आहेत. यातील केवळ ५ टक्के रुग्णच अत्यवस्थ आहेत.  बरे होणाºयांची संख्या सातत्याने वाढत आहे.  गेल्या २४ तासात कोविड-१९ चे १३,९२५ रुग्ण बरे झाले आहेत.
चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणि पायाभूत सुविधा वाढविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे  शासकीय प्रयोगशाळांची संख्या ७२२ पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या २५९ पर्यंत वाढली आहे. सध्या देशात एकूण ९८१ प्रयोगशाळा आहेत.

केंद्र सरकारने चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी जास्तीत जास्त प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या प्रयत्नातून जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. सध्या ५४७ प्रयोगशाळा सुरू आहेत. यापैकी ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा ३५८ आहेत. देशात चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. आत्तापर्यंत तब्बल ६८ लाख नमुने तपासण्यात आले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती