भारत आणि चीनच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनी मालावर बहिष्कार घातला जात आहे. प्रख्यता अभिनेत्री कंगना रानौटने यासाठी भावपूर्ण आवाहन केले आहे. आपल्याच हातांनी कोणी आपली बोटे कापणार असतील तर आपण काय करू? असे म्हणत चीनी माल घेऊन त्यांची अर्थव्यवस्था बळकट करू नका असे आवाहन कंगनाने केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनी मालावर बहिष्कार घातला जात आहे. प्रख्यता अभिनेत्री कंगना रानौटने यासाठी भावपूर्ण आवाहन केले आहे. आपल्याच हातांनी कोणी आपली बोटे कापणार असतील तर आपण काय करू? असे म्हणत चीनी माल घेऊन त्यांची अर्थव्यवस्था बळकट करू नका असे आवाहन कंगनाने केले आहे.
कंगना रानोटने एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे, त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करत कंगनाने चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. कंगना म्हणते, जर कोणी आपल्याच हातांनी आपलीच बोटे कापण्याचा प्रयत्न करू लागले तर आपल्याला कसे वाटेल. किती दु:ख होईल. तोच प्रकार चीनने लडाख सीमेवर आपल्या केला आहे.
आपली इंच इंच जमीन वाचवाताना २० जवान शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू आपण विसरू शकतो का? युध्द केवळ सरकार आणि लष्करानेच लढायचे असते का? आपले त्यामध्ये काहीच योगदान नको का?
जनतेने चीनविरुध्दच्या युध्दात सर्व शक्तीनिशी सहभागी व्हायचे आवाहन करताना कंगना म्हणते, लडाख हा केवळ जमीनीचा एक तुकडा नाही तर भारताची अस्मिता आहे. त्यामुळेच आपण चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे. ज्या कंपन्यांमध्ये चीनने गुंतवणूक केली आहे त्यांच्यावरही बहिष्कार टाकायला हवा.
ते आपल्या येथे पैसे कमावितात आणि त्यातूनच शस्त्रास्त्रे विकत घेतात. त्याचा वापर आपल्याच सैनिकांच्या विरुध्द करतात. त्यामुळेच या युध्दात आपण चीनच्या सोबत आहोत की भारताच्या सोबत याचा विचार करायला हवा. आपण प्रतिज्ञा करायला हवा की आत्मनिर्भर बनू आणि चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून या युध्दात भारताला विजय मिळवून देऊ.