चीनी कंपन्यांची १००० कोटींची अफरातफर; आयकर विभागाचे छापे

  • चीनी व्यक्तींच्या आदेशानुसार डमी संस्थांच्या ४० हून अधिक बँक खात्यांमध्ये १००० कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा

वृत्तसंस्था

मुंबई : बनावट कंपन्या तयार करून १००० कोटी रूपयांची अफरातफर करण्याचा चीनी गैरव्यवहार उघडकीस आला आहे.  बनावट कंपन्यांच्या चेनमधील काही चीनी व्यक्ती आणि त्यांचे भारतीय साथीदार मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारात गुंतल्याची केंद्रीय अर्थमंत्रालयाला माहिती मिळाल्यानंतर देशभर छापे घालण्यात आले आहेत.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीच्या आधारे आयकर विभागाने या चीनी कंपन्या, त्यांचे निकटवर्तीय आणि काही बँक कर्मचारी यांच्यावर देशात वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे घालून शोध करण्यात येत आहे.

चीनी व्यक्तींच्या आदेशानुसार, विविध डमी संस्थांमध्ये ४० हून अधिक बँक खाती तयार केली गेली आणि त्या काळात १००० कोटी रूपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

चीनी कंपनीच्या सहाय्यक कंपनीने आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी भारतात किरकोळ शोरूमचे व्यवसाय सुरू करण्यासाठी शेल संस्थांकडून १०० कोटी रुपयांचे बोगस व्यवहार केले आहेत.

या छाप्यांमध्ये हवाला व्यवहार आणि बँक कर्मचारी आणि चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या सक्रिय सहभागासह पैशांची लँडिंग यासंदर्भात गुन्हेगारीची कागदपत्रे सापडली आहेत. हाँगकाँग आणि अमेरिकन डॉलर्सच्या विदेशी हवाला व्यवहारांचे पुरावेही सापडले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे.

सीबीडीटीचे निवेदन

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने या संदर्भात निवेदनात म्हटले आहे की, शेल एजन्सीच्या साखळीद्वारे काही चीनी व्यक्ती आणि त्यांचे भारतीय सहकारी मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारात सामील होते. त्या माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली गेली. चीनी व्यक्तींच्या आदेशानुसार, विविध बोगस संस्थामध्ये ४० हून अधिक बँक खाती तयार केली गेली आणि त्या कालावधीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा झाली आहे.

चिनी कंपनीची सहाय्यक कंपनी आणि त्यासंबंधित लोकांनी भारतात किरकोळ शोरूमचे व्यवसाय उघडण्यासाठी बोगस संस्थांकडून १००० कोटी रुपयांच्या बोगस अ‍ॅडव्हान्स घेतल्या आहेत. हवाला व्यवहार आणि बँक कर्मचारी आणि चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या मदतीने पैशांची लँडिंग या संदर्भातील गुन्हेगारीची कागदपत्रे सापडली आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*