चीनशी दीर्घ आणि चिकाटीच्या संघर्षाची भारताची ठोस तयारी

  •  सामरिक, राजनैतिक, आर्थिक आघाड्यांवर व्यूहरचनात्मक बांधबंदिस्ती

विनायक ढेरे

नवी दिल्ली : चीनच्या हेकेखोरीपुढे कोणत्याही स्थितीत झुकायचे नाही. ही मानसिकता बळकट करीत भारत चीनशी दीर्घ आणि चिकाटीच्या संघर्षाची तयारी करीत आहे. संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाच्या पातळ्यांवर शांततेची कबुतरे उडविण्याची मानसिकता इतिहासजमा करून भारतीय राजकीय, सामरिक, राजनैतिक नेतृत्वाने ठोस निर्णय घेणारी दमदार पावले उचलेली दिसताहेत. देशातील राजकीय आरोप – प्रत्यारोप आणि राजकीय गदारोळ यांच्या पलिकडे जाऊन निरीक्षणे नोंदविण्याचा हा विषय आहे. “शत्रूकडे अण्वस्त्रे आहेत, तर भारताची अण्वस्त्रे दिवाळीतले फटाके उडविण्यासाठी विकसित केली आहेत काय…!!”, हे विधान आठवतंय? कोणी केले होते, ते…!!

सीमेवर बोफोर्स हॉवित्झर तोफा, दीर्घ पल्ल्याच्या मारक क्षमतेचे रणगाडे, सुखोई ३०, चिनूक्सची हवाई गस्त आणि माऊंटन फोर्सची वेगवान तैनाती यातून भारताची assertive भूमिका आंतरराष्ट्रीय समूदायाच्याही लक्षात आली आहे. अमेरिकेच्या फौजा युरोपमधून बाहेर काढून दक्षिण आशियात तैनात करण्याची व्यूहरचना त्याचे एक निदर्शक आहे. १९७१ बांगलादेश निर्मितीच्या युद्धात अमेरिकेने नौदलाती seventh fleet बंगालच्या उपसागरात आणण्याची तयारी करण्याएवढीच ही महत्त्वाची चाल आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा रशिया दौराही अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरला आहे.

अर्थात त्याच बरोबर assertive political move म्हणून भारतीय नेतृत्वाने परराष्ट्र मंत्रालयातून जगभरातील देशांना संदेश रवाना करताना लडाखमधील व्यूहरचनात्मक स्थितीची बिनचूक माहिती दिली आहे. चीन सातत्याने माहिती लपवत असतो, या पार्श्वभूमीवर भारताच्या या initiative ला आंतरराष्ट्रीय राजनैतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक जनमत भारताच्या बाजूने निर्णायक पातळीवर वळविण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. मोठे देश जागतिक पातळीवर संदेशवहन नियमितपणे करत असतात. पण भारत आज देत असलेला संदेश जगातील लोकशाही देशांच्या एकजूटीचा पाया मजबूत करणारा ठरतो आहे. “माओवादी कम्युनिस्ट विस्तारवादी चीन विरोधा”तील तो दृढमूल एकजूटीचा संदेश आहे.

Boycott China, आत्मनिर्भरता, make in india हे नुसते शब्द नाहीत. दीर्घकाळाच्या संघर्षाची ती “धोरणात्मक” तयारी आहे. हे धोरण जसे यशस्वी होत जाईल तशी लढाई अधिक तीव्र आणि चिकाटीची होत जाईल. यात जगाची मोलाची साथ भारताच्या बाजूने राहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारत – चीनमध्ये लष्करी, मुत्सद्दी पातळीवरील चर्चेमधील कोंडी एवढ्यात सुटणार नाही. दोन महिन्यांपासून नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव इतक्यात निवळणार नाही, याची भारतीय नेतृत्वाला पूर्ण कल्पना आहे.

या संदर्भात सेवेत असणाऱ्या अत्यंत वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्याचे statement अत्यंत महत्त्वाचे आहे, “सीमेवरील परिस्थिती आपल्या पद्धतीने हाताळण्यासाठी सैन्य दलांना पूर्णपणे ‘फ्री हँड’ मोकळीक देण्यात आली आहे. चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर पुरेशा प्रमाणात सैन्य तैनाती, लष्करी साहित्य पोहोचवण्यात आले आहे. चीनच्या हेकेखोर भूमिकेमुळे चर्चेतून काहीही निष्पन्न होत नाही. पण चर्चा बंद करायची नाही, ती सुरुच ठेवायची असे दोन्ही बाजूंनी ठरवलेय ही चांगली बाब असली तरी तयारीत भारत कुठेही कमी पडत नाही.”, हे ते statement… It speeks a lot.

भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर आणि माजी हवाईदल उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले यांनी भारताची assertive भूमिका अधोरेखित केली आहे.

राजनैतिक पातळीवर बीजींगमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. लष्करी पातळीवर लडाखमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये सहा आणि २२ जून अशा चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. पण परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तशीच परिस्थिती ‘जैसे थे’ कायम ठेवण्याची भारताची मागणी आहे. पण चिनी सैन्य फिंगर फोर भागातून माघार घ्यायला तयार नाही, याचा पुरेसा “गंभीर संदेश” भारतीय बाजूने घेतला आहे.

“हा वाद इतक्यात मिटणार नाही. दीर्घ संघर्षासाठी भारतही तयार आहे. भौगोलिक अखंडतेशी भारत कोणतीही तडजोड करणार नाही,” हा संदेश “पुरेशा गांभीर्याने” चीनी बाजूला पोहोचविण्याची बांधबंदिस्ती भारतीय नेतृत्वाने केली आहे… राजनैतिक पातळीवर चीनने आढेवेढे घेत एेकले तरी सध्या चालेल… अन्यथा भारत “तयार” आहेच…!! जगही साथीला येतेय…!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*