चीनवर कठोर कारवाई, राम माधव यांचे संकेत


जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. यामुळे सरकारच्या मनात निश्चितच कुठलातरी विचार असेल, असे सांगत चीनविरुध्द कठोर कारवाईचे संकेत भारतीय जनता पक्षाचे सरचिटणिस राम माधव यांनी दिले आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. यामुळे सरकारच्या मनात निश्चितच कुठलातरी विचार असेल, असे सांगत चीनविरुध्द कठोर कारवाईचे संकेत भारतीय जनता पक्षाचे सरचिटणिस राम माधव यांनी दिले आहेत.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राम माधव म्हणाले, सरकारचे पुढचे पाऊल काय असेल याची आपण वाट बघूया. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान मोदी सांगत असतील तर याचा अर्थ नक्कीच त्यांनी पुढच्या पावलाचा विचार केलेला असणार. चिनी सैनिकांनी सर्व करार, संकेत, नीतीनियम बाजूला ठेवून सीमेवर भारतीय जवानांचा नरसंहार केला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्व पक्षांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे.

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनेत भारतीय जवानांनी सीमेचे रक्षण करत बलिदान दिले. सीमेत घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैनिकांना जवानांनी रोखले. यामुळे भारताच्या एक इंच जागेवरही चीनला ताबा मिळवता आला नाही, असे सांगून राम माधव म्हणाले, चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्यास भारतीय जवान त्यांना रोखतात.

चीनसोबत झालेल्या करारामुळे या घटनांमध्ये शस्त्रांचा वापर करता येत नाही. चीनसोबत आपल्याला मैत्री हवी आहे. पण देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कायम सतर्क राहू. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांना मागे हटण्यात भारताने बाध्य केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था