चीनमधून बाहेर पडून २४ कंपन्या भारतात येण्यात दाखवताहेत रस

  • जागतिक बाजारपेठेतील मोबाईल उत्पादनाचा १०% हिस्सा भारताचा होणार
  • ११ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे मोबाइल कंपन्यांचे नियाेजन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनमधून बाहेर पडणाऱ्या २४ कंपन्या भारतात येण्यात रस दाखवत अाहेत. जागतिक व्यवसायाला आकर्षित करण्यासाठी भारत नव्या प्रोत्साहन आराखड्यावर काम करत आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सपासून अॅपलपर्यंत असेंब्लिंग पार्टनर भारतात रस दाखवताना दिसत आहे. सध्या जवळपास २४ कंपन्या आपले मोबाइल फोन कारखाने स्थापण्याच्या योजनेवर काम करत आहेत.

मोदी सरकारने मार्चमध्ये काही क्षेत्रासाठी नव्या प्रोत्साहन आराखड्याची घोषणा केली होती. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी येत्या पाच वर्षांपर्यंत त्यांच्या इन्क्रिमेंटल सेल्सची ४% ते ६% रक्कम प्रोत्साहन म्हणून मिळेल. याचा परिणाम असा दिसला की, दोन डझनापेक्षा जास्त कंपन्या मोबाइल फोन श्रेणीत ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहेत.

सॅमसंगशिवाय फॉक्सकॉन, विस्ट्रॉन कॉर्प आणि पेनाट्रॉन कॉर्पसारख्या मोठ्या कंपन्याही रस दाखवत आहेत. भारतानेही याच पद्धतीचा इन्सेंटिव्ह प्लॅन फार्मास्युटिकल व्यवसायासाठी जारी केला आहे. यासोबत अनेक क्षेत्रासाठी याच पद्धतीच्या प्रोत्साहन आणि अन्य सुविधा देण्याची याेजना आहे. याअंतर्गत ऑटोमोबाइल, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया कार्यक्रमास प्राधान्य आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि कोरोना विषाणू संकटामुळे खूप साऱ्या कंपन्या आपल्या पुरवठा साखळीला चीनशिवाय अन्य दुसऱ्या देशांत शिफ्ट करण्यासाठी खूप गंभीर प्रयत्न करत आहेत.

मात्र, भारताला यासंदर्भात खूप जास्त फायदा मिळाला नाही. स्टँडर्ड चार्टरने नुकत्याच केलेल्या पाहणीत चीनमधून बाहेर निघणाऱ्या कंपन्यांचा सर्वात जास्त फायदा व्हिएतनामला झाला आहे.

पाच वर्षांत ४ लाख कोटींची गुंतवणूक

क्रेडिट सुइसच्या एका अहवालानुसार, सरकारद्वारे जाहीर प्रोत्साहन येत्या ५ वर्षांत ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक देशात आणण्यात मदत करू शकते. ही गंुतवणूक भारताच्या आर्थिक उत्पादनात ०.५% अतिरिक्त जोडेल. पाच वर्षंात जागतिक स्मार्टफोन उत्पादनाचा १०% हिस्सा भारतात स्थलांतरित होऊ शकतो.

सॅमसंगचे ३ लाख कोटी स्मार्टफोन

सॅमसंगची ३ लाख कोटी रुपये किमतीचे स्मार्टफोन भारतात तयार करण्याची योजना आहे. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, सॅमसंग, व्हिएतनाम आणि अन्य दुसऱ्या देशांतून आपल्या उत्पादनाचा मोठा हिस्सा भारतात शिफ्ट करू शकते. मात्र, कंपनीने या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*