भारताविरुध्द सतत कुरापती करत सीमेवर तणावाची स्थिती निर्माण करणार्या चीनने आता ऑस्ट्रेलियाविरुध्दही पंगा घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या निकट असलेल्या छोट्याशा किरीबाती नावाच्या देशाच्या आडून चीन ऑस्ट्रेलियाला डोळे दाखवत आहे.
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : भारताविरुध्द सतत कुरापती करत सीमेवर तणावाची स्थिती निर्माण करणार्या चीनने आता ऑस्ट्रेलियाविरुध्दही पंगा घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या निकट असलेल्या छोट्याशा किरीबाती नावाच्या देशाच्या आडून चीन ऑस्ट्रेलियाला डोळे दाखवत आहे.
ऑस्ट्रेलिया किरबाती या देशासाठी पालकत्याची भूमिका निभावत आला आहे. 2011 के 2017 दरम्यान ऑस्ट्रेलियाने या देशाला 6.25 अब्ज डॉलरची आर्थिक मदत केली. पण आता चीनने तेथे हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आपला दुतावास या ठिकाणी सुरू केला आहे. त्यामुळे चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीन अधिक बळकट होत चालला आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाचेही हे एक मोठे कारण आहे.
आशिया आणि अमेरिका एकमेंकाला जोडतात त्या पॅसिफिक महासागराच्या भागात किरीबाती आहे. त्यामुळे हा देश व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पॅसिफिक महासागरामध्ये असलेल्या अमेरिकेचा दबदबा या माध्यमातून चीनला कमी करायचा आहे.
चीनची आधीपासूनच किरीबातीवर नजर आहे. 2006 मध्ये चीनचे तत्कालीन राष्ट्रपती वेन जियाबाओ येथे आले होते. या देशाला आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली होती. किरबातीची जीडीपी फक्त 33.77 बिलियन डॉलर आहे.