चित्रपट सुविधा कार्यालयात एक खिडकी केंद्र, कान्स महोत्सव उद्घाटनात जावडेकर यांची माहिती


चित्रपट ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणजेच वेगळ्या प्रकारचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच चित्रपट सुविधा कार्यालयाला केंद्र आणि राज्य सरकारांच्या सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी एक खिडकी केंद्र बनवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतात येऊन चित्रिकरण करण्याचे आणि जागतिक बाजारात या चित्रपटांचे वितरण करण्याचे आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चित्रपट ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणजेच वेगळ्या प्रकारचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच चित्रपट सुविधा कार्यालयाला केंद्र आणि राज्य सरकारांच्या सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी एक खिडकी केंद्र बनवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतात येऊन चित्रिकरण करण्याचे आणि जागतिक बाजारात या चित्रपटांचे वितरण करण्याचे आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

जावडेकर यांच्या हस्ते व्हर्चुअल इंडिया पॅव्हिलियनच्या ई- उद्घाटनाने कान चित्रपट महोत्सव-2020 मधील भारतीय सहभागाची सुरूवात झाली. 22 ते 26 जून 2020 या काळात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे ज्या काळात मानवतेला एका सामाईक आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे त्या काळात एकजुटीचा आदर्श कान फिल्म मार्केटच्या व्हर्चुअल आवृत्तीने निर्माण केला आहे. व्हर्चुअल उद्घाटने नवी सर्वसामान्य बाब ठरणार आहे. हे आभासी अवकाश आता वास्तविक भागीदार्यांचे नवे स्थान म्हणून उदयाला येणार आहे.

कान चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅव्हिलियनमधून जगाला भारतीय चित्रपटांचे रंग, गंध यांची अनुभूती मिळते, असे सांगून जावडेकर म्हणाले, भारतीय चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्याच्या संधी आंतरराष्ट्रीय निर्माता-दिग्दर्शकांना मिळणार आहेत. अनेक प्रकारच्या वैशिष्टयांनी परिपूर्ण ठिकाणे असलेल्या अतुल्य भारतामध्ये चित्रिकरण करण्याची संधी मिळू शकते.

भारतीय पॅव्हिलियनमध्ये माईघाट: क्राईम नंबर 103/2005 (मराठी) आणि हेलारो (गुजराती) या दोन्ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येत आहे. महान चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या पुढील वर्षी असलेल्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या काही चित्रपटांचे आणि संगीत आणि माहितीपटांचे प्रदर्शन देखील इंडियन पॅव्हेलियन वेबसाईटवर प्रदर्शन करणार आहे.

भारतातील चित्रिकरण आणि सहनिर्मितीचा अनुभव असलेल्या दिग्दर्शकांची माहिती या वेबसाईटवर असेल. तसेच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगाशी संबंध प्रस्थापित करण्यामध्ये स्वारस्य असलेल्या निर्मात्यांची यादी देखील वेबसाईटवर उपलब्ध असेल.

या महोत्सवात व्हर्चुअल माध्यमातून परस्परांशी संवाद घडवून आणणार्या बैठकांव्यतिरिक्त दर दिवशी प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील विविध पैलूंबाबत जगभरातील तज्ञांची गोलमेज चर्चासत्रे आयोजित होणार आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती