खरा हिरो..! चीनसोबतचा ९०० कोटींचा करार हिरो सायकलने केला रद्द, सुट्टे भागही भारतीय कंपन्यांकडूनच घेणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गलवान खोरयामध्ये कुरापत काढण्याचा प्रकार चीनसाठी दररोज नवे धक्के देत आहे. एकीकडे मोदी सरकारने चीनी आयातीला प्रतिबंध करण्यासाठी व चीनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करण्यासाठी भराभर पावले उचलली असताना आता  भारतातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने चीनसोबतचा भविष्यातील ९०० कोटींचा करार रद्द केला आहे.

करोना महामारीच्या काळात अनेक कंपन्या आर्थिक डबघाईला आल्या आहेत. पण हिरो सायकल अशा बिकट परिस्थितीतही सुसाट धावत आहे. अलिकडेच हिरो सायकल कंपनीने करोना विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारला १०० कोटी रुपयांची मदत दिली होती. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे हिरो सायकल कंपनीनं चीनवर बहिष्कार टाकत करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हिरो सायकलने एका चिनी कंपनीशी केलेला तब्बल ९०० कोटी रुपयांचा व्यवहार रद्द केला आहे. हा व्यवहार पुढील तीन महिन्यात पूर्ण होणार होता.

हिरो सायकल यावरच थांबलेली नाही. तिने चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणखी पावले उचचली आहेत. त्यामध्ये चीनऐवजी जर्मनीत नवा प्रकल्प चालू करणे, चीनी कंपन्यांकडून सुट्टे भाग घेण्याऐवजी भारतीय लघु व मध्यम कंपन्यांना प्राधान्य देणे यांचा समावेश आहे.

गलवानमधील कुसाहसानंतर सर्वच भारतीयांच्या मनात चीनविषयी तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. देशभरात चिनी वस्तुंचा बहिष्कार करण्याची मागणी होतेय. सोशल मीडियावर Boycott Chinese Product अशी मोहिम राबवली जात आहे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*