‘खरा पुरुष असशील तर राजीनामा दे, निलेश राणे यांचे आदित्य ठाकरे यांना आव्हान

खरा पुरुष असशील तर राजीनामा दे, असे ट्विट करुन भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंचेही नाव घेतले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी अदित्य ठाकरेंवर घणाघात केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : खरा पुरुष असशील तर राजीनामा दे, असे ट्वीट करुन भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंचेही नाव घेतले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघात केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीसांनी बॉलीवुडमधील अनेकांची चौकशी सुरू केली होती. मात्र, काही जणांची चौकशी करण्यात आली नव्हती. प्रसिध्द निर्माते करण जोहर यांची चौकशी न करता त्यांच्या मॅनेजरची चौकशी करण्यात आली होती.

प्रसिध्द अभिनेत्री कंगना राणावतने आरोप केला होता की, जोहर हे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मित्र आहेत. त्यामुळेच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते निलेश राणेंनी अदित्य ठाकरेंच्या अकाउंटचा फोटो शेअर करुन लिहीले की, ‘शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रीपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही. खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो.’

सीबीआय चौकशीत अनेक मोठ्या व्यक्तींची नावे उलगडू शकतात त्यामुळे मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात असून तपासासाठी वेळ घालवण्यात येत असल्याचे आरोप करण्यात येत होते. यातच आता, आदित्य ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मंत्री पदाचा उल्लेख काढला गेला आहे. त्यामुळेच निलेश राणेंनी अदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*