कोरोनामुळे जगाने योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने घेतले : पंतप्रधान नरेंद्र मोदी


 निष्काम कर्मयोगाची भावना भारताच्या नसानसात


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले असताना जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटात जग योगाला अधिक गांभीर्याने घेत आहे. योगामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ होते. त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्यात स्थान द्यावे,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

२०१५ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज सहावा योग दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “योग दिन हा एकात्मतेचा दिवस आहे. जो आपाल्याला जोडतो. सोबत आणतो तोच तर योग आहे. करोनाच्या या संकटाच्या काळात जगभरातील लोकांनी माय लाईफ माय योग या स्पर्धेत सहभाग हे दाखवून देतो की, लोकांच्या योगाविषयी उत्साह वाढत आहे. यावर्षी योगाचे ब्रीदवाक्य “घरातच योग, कुटुंबासमवेत योग” असे आहे. आज सगळे कुटुंबासह योग करत आहे. योगाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होता. कौटुंबिक बंध वाढवण्याचाही हा दिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळे जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने घेत आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोनाला हरवण्यात मदत मिळते. योगाची अनेक आसने आहेत. ती आपल्या शरीराची शक्ती वाढवतात.”

“करोना विषाणू आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. यासाठी अनुलोम विनुलोम प्राणायम आहे. प्राणायमाचे असंख्य प्रकार आहेत. योगाची ही आसने श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे प्रत्येकानं प्राणायमाचा दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावा. कोरोना झालेल्या लोकांनाही यातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती मिळते. संयम व सहनशक्तीही मिळते,” असे मोदी यांनी स्पष्ट केले.

मोदी म्हणाले, “कितीही वाईट परिस्थिती असली तरीही क्रियाशील राहणे. हार न मानणे हे योगामुळे साध्य होते. आपल्या आयुष्यात ऊर्जा मिळते. योग करणारी व्यक्ती कधीही घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे हेच तर योगाचे वैशिष्ट्य आहे. योग सर्व भेदभावांच्या वर आहे. तो कुणीही करू शकतो. योगाच्या माध्यमातून समस्याच्या निराकरणाची गोष्ट करत आहोत. योगामुळे जीवनात अधिक योग्य बननण्याची क्षमता प्राप्त होते.”

“निष्काम कर्मयोगाची भावना भारताच्या नसानसात आहे. जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा जगाने याचा अनुभव घेतला आहे. स्वतःच्या, आपल्या स्वकीयांच्या आरोग्यासाठी सजगपणे एकजुटीने पुढे जाऊ. आपण प्रयत्न करू की, घरात योगा व कुटुंबीयांसोबत योगा हे दररोज करू. हे केलं तर आपण जरूर यशस्वी होऊ,” अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती