केंद्र करणार ३०० कोटी मनुष्यदिन रोजगारनिर्मिती

चीनी व्हायरसमुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्था संकटात आली. त्यामुळे कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी केंद्र सरकार मनरेगासाठी तब्बल ४० हजार कोटी रुपयांचा जादा निधी देणार आहे. त्यामुळे तब्बल ३०० कोटी मनुष्यदिन रोजगार निर्मिती होणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसमुळे लागू कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्था संकटात आली. त्यामुळे कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी केंद्र सरकार मनरेगासाठी तब्बल ४० हजार कोटी रुपयांचा जादा निधी देणार आहे. त्यामुळे तब्बल ३०० कोटी मनुष्यदिन रोजगार निर्मिती होणार आहे.

चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर देशातील अनेक उद्योगांना मंदीचा सामना करावा लागत आहे. कोट्यवधी स्थलांतरीत कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांतील सरकारे त्यांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

त्यांना आता मनरेगाचाही आधार मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजच्या चौथ्या टप्प्यात रोजगाराला चालना मिळावी म्हणून मनरेगासाठी अतिरिक्त 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, पुणे यासारख्या शहरांतून लाखो स्थलांतरीत मजूर आपापल्या गावी परतले आहेत. त्यांना आगामी पावसाळ्यात यामुळे काम मिळणार आहे. त्याचबरोबर रस्ते, जलसंधारणाची कामे होऊन विकासाला हातभार लागणार आहे. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*