केंद्र-ओडिशा सरकार जगन्नाथ रथयात्रेसाठी एकत्र; सर्वोच्च न्यायायलयात मांडली अनुकूल भूमिका


  • लॉकडाऊन काळातही संयमाने यात्रा काढणे शक्य
  • “भगवान जगन्नाथ उद्या येऊ शकले नाही, तर पुढील १२ वर्ष येऊ शकणार नाहीत”, सरकारची कोर्टात बाजू
  • शतकांची परंपरा थांबवता येणार नसल्याची ग्वाही

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शतकांची उज्ज्वल परंपरा असलेली जगन्नाथ रथयात्रा संयमाने आणि लॉकडाऊनची नियमावली पाळून सुरू ठेवता येऊ शकते. त्याला परवानगी नाकारू नये, अशी भूमिका केंद्र व ओडिशा सरकारांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. रथयात्रा रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर वाद होऊन अनेक पुनर्विचार याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरच्या सुनावणीत केंद्र आणि ओडिशा सरकारांच्या वकिलांनी रथयात्रेसाठी अनुकूल भूमिका मांडली.

न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोरील सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. इतक्या शतकांची परंपरा थांबवली जाऊ शकत नाही. करोडो लोकांच्या श्रद्धेचा हा विषय आहे. जर भगवान जगन्नाथ उद्या येऊ शकले नाही, तर परंपरेप्रमाणे पुढील १२ वर्ष ते येऊ शकत नाहीत, असे न्यायालयाला सांगितले.

केंद्र सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. त्यांचे पालन करून हा कार्यक्रम घेता येऊ शकतो. लोकांची गर्दी न करता, करोना चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या पुजाऱ्यांना परवानगी देत ही रथयात्रा होऊ शकते, अशी बाजू त्यांनी खंडपीठासमोर मांडली.

“करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी पूर्वकाळजी घेत राज्य सरकार दिवसभरासाठी कर्फ्यू जाहीर करू शकते. लोक टीव्हीवरूनच दर्शन घेऊ शकतात. पुरीच राजा आणि मंदिर समिती सर्व व्यवस्था करेल,” अशी माहितीही मेहता यांनी दिली. ओडिशा सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी सॉलिसिटर जनरल यांच्या प्रस्तावाशी सहमत असल्याचे सांगितले.

आम्ही रथयात्रेला परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाही, असे सांगत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रथयात्रेला परवानगी नाकारली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी याचिका करण्यात आल्या आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था