केंद्राने फटकारूनही सुधारले नाहीत, तेलंगणामध्ये सर्वाधिक रुग्णवाढ

चीनी व्हायरसच्या तपासणीसाठी चाचण्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारने वारंवार फटकारूनही सुधारले नसल्याची किंमत तेलंगणाला चुकवावी लागत आहे. येथील चीनी व्हायरसच्या रुग्णवाढीचा दर सर्वाधिक झाला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या तपासणीसाठी चाचण्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारने वारंवार फटकारूनही सुधारले नसल्याची किंमत तेलंगणाला चुकवावी लागत आहे. येथील चीनी व्हायरसच्या रुग्णवाढीचा दर सर्वाधिक झाला आहे.

चीनी व्हायरसच्या टक्केवारीचा विचार केला तर तेलंगणा देशात पहिल्या स्थानी आणि महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी गेला आहे. केंद्राने यापूर्वीच तेलंगणाला जास्तीत जास्त चाचण्या करण्यास सांगितले होते. महाराष्ट्रात रुग्ण (पॉझिटिव्ह केसेस) १८.७ टक्के तर दिल्लीत १६.३ टक्के आहेत.

महाराष्ट्रात १.८६ लाख तर दिल्लीत ८९८०२ चीनी व्हायरसचे रुग्ण आहेत. त्या तुलनेत तेलंगणमध्ये ते १७३५७ आहेत. परंतु, १७ जून रोजी तेलंगणमध्ये २६९ रुग्ण होते ते एक जुलै रोजी १७ हजार ३५७ झाले. ही वाढ फक्त पंधरवड्यात ६० पटींपेक्षा जास्त झाली. इतर राज्यांतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असताना तेलंगणामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत.

केंद्र सरकारने आणि उच्च न्यायालयाने तेलंगणला कमी चाचण्या करत असल्यामुळे फटकारले नसते तर एवढे रुग्ण तेथे उघड झाले नसते. तेलंगणमध्ये रोज होणाऱ्या चाचण्या १७ जून रोजी फक्त १०९६ होत्या. त्या आता एक जुलैच्या रात्री ७६९१ झाल्या. गेल्या १५ दिवसांत चाचण्या सात पटीत (१०९६ वरून एक जुलै रोजी ७६९१) वाढल्या. शेजारच्या आंध्र प्रदेशने ९.१८ लाख चाचण्या केल्या व त्याचा पॉझिटिव्ह केसेसचा दर हा फक्त १.७ टक्के आहे. हा दर देशात सगळ्यात कमी आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*