भारतीय सैन्याने चिन्यांना काला टॉप शिखरांवर हाकलून लावल्यावर लडाखमधील ग्रामस्थांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. सैनिकांचे कौतुक करण्यासाठी ग्रामस्थ जीवनावश्यक वस्तू घेऊन पोहोचले. यामध्ये महिला आणि बौध्द भिक्षूंचाही समावेश आहे.
विशेष प्रतिनिधी
लडाख : भारतीय सैन्याने चीन्यांना काला टॉप शिखरांवर हाकलून लावल्यावर लडाखमधील ग्रामस्थांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. सैनिकांचे कौतुक करण्यासाठी ग्रामस्थ जीवनावश्यक वस्तू घेऊन पोहोचले. यामध्ये महिला आणि बौध्द भिक्षूंचाही समावेश आहे.
कुरापतखोर चीनला भारतीय सैन्याने धक्का देत काला टॉप शिखर जिंकून घेतले. याच शिखराच्या शेजारी असलेल्या लडाखमधील चुशुल गावात यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. चीन्यांना पळवून लावणाऱ्या सैनिकांनी शिखरावर पोहोचल्यावर येथे तळ उभारला. जीवनावश्यक वस्तू येथपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी गावात काही हमालांची मागणी केली. हे समजल्यावर शंभरहून अधिक तरुण स्वयंसेवक म्हणून पोहोचले.
या भागात पहिल्यांदाच सैन्याची हालचाल सुरू झाली आहे. अत्यंत दुर्गम आणि उंचावर असलेल्या या भागात सैन्याने सामान पाठीवर लादून पोहोचविण्यासाठी अनेक स्वयंसेवक तयार झाले. जवानांना अंथरुणासह आणखी जीवनावश्यक वस्तूंची गरज होती. ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली होती.
या शिखरावर पोहोचण्यासाठी तीन तासांचा कष्टदायी प्रवास करावा लागतो. परंतु, जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणीही मागे हटले नाही. काला टॉप बरोबरच या परिसरातील गुरंग टेकडीवरही भारतीय सैन्याने ताबा मिळविला आहे. त्या परिसरातील गावांतूनही सैनिकांसाठी मदत जात आहे. यामध्ये तरुणांबरोबरच महिला आणि बौध्द भिक्षूंचाही समावेश आहे. ते सैनिकांना स्थानिक पदार्थ आणि पाणी पुरवित आहेत.