कांदा उत्पादकांना ५५ कोटींची झळ

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कांद्याला यंदा अपेक्षित दर नसल्याने कांदा उत्पादकांना रडवत आहे. केंद्र सरकार बाजारभावावर धोरण ठरविण्याऐवजी एक देश,एक बाजारसारख्या योजना आणून गाजर देत आहे. यातच पिंपळगाव बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तेवढीच आवक होऊनही तब्बल ५५ कोटी रूपयांची झळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे.

गेल्या वर्षी उन्हाळ कांद्याचे दर थेट चौदा हजार रूपये प्रतिक्विंटल असे रेकॉर्ड ब्रेक झाले. या दराने शेतकऱ्यांना पुन्हा कांद्याने आकर्षित केले. वाढलेले क्षेत्र व अनुकूल वातावरण यामुळे एप्रिलमध्ये उन्हाळ कांद्याचे बंपर पीक बाजारात आले. पण रोडावलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची फसगत झाली. त्यातच कोरोनाचा संसर्ग दुष्काळात तेरावा महिना ठरला. लॉकडाऊनमुळे देश-परदेशातील बाजारपेठा ठप्प राहिल्या. कोलंबो, मलेशिया,इंडोनेशिया,कतार,गल्फ देशांतील हॉटेल व्यवसायाला पर्यटकांअभावी ब्रेक लागला आणि त्यातून कांद्याच्या म गणीत घट झाली.

५५ कोटी रूपयांची झळ

पिंपळगाव बाजार समितीत गेल्या वर्षीपेक्षा यंदा एप्रिल ते जुलै या चार महिन्यात उन्हाळ कांद्याची आवक एक लाख तीन हजार क्विंटलने वाढली असे असून कांद्याचे दर एवढे नीचांकी पातळीवर आले की गेल्या वर्षीपेक्षा ५५ कोटी रूपये शेतकऱ्यांना कमी मिळाले. गेल्या वर्षी सरासरी एक हजार १०० रूपये प्रतिक्विंटलचा दर यंदा ४०० रूपयांपर्यत घसरून ७००० रूपये एवढा आहे. शेतकऱ्यांना बरोबर पिंपळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात ५५ लाख रूपयांची घट झाली आहे.

दररोज दोनशेची वाढ

बंगळुरू,हुबळी,परिसर नवीन कांद्याचे आगमन लांबल्याने कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल दोनशे रूपयांनी सुधारणा झाली आहे,.गेल्या वर्षीच्या तुलनेत तेवढीच आवक होऊनही तोटा मात्र कायम आहे. लॉकडाऊन व बंपर आवक यामुळे दरात तेजी आली नाही, बांग्लादेशमध्ये कांद्याला उठाव असल्याने हे दर टिकून आहेत. असे कांदा व्यापारी दिनेश बागरेचा यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी आतबट्याचे पीक ठरले आहे, अवघ्या चार महिन्यात ५५ कोटी रूपयांची तूट शेतकरी व बाजार समितीच्या हातोडा आहे. असे आमदार व सभापती दिलीप बनकर यांनी सांगितले

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*