काँग्रेस नरसिंह रावांचा वारसा नाकारायचा करंटेपणा करतीय

जन्मशताब्दीनिमित्त काँग्रेस मुख्यालयात ना कार्यक्रम, ना श्रद्धांजली; आलेय फक्त कोरडे ट्विट


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय आर्थिक उदारीकरणाच्या सुधारणावादाचे जनक माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा उज्ज्वल वारसा नाकारायचा करंटेपणा १० जनपथ आणि त्यांचे अंकित काँग्रेसजन करताहेत.

नरसिंह रावांची जन्मशताब्दी आज सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मन की बातमधून श्रद्धांजली अर्पण केली. अनेक नेते, कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून त्यांचे स्मरण केेले. पण २४ अकबर रोड, काँग्रेस मुख्यालयात ना आज मोठा कार्यक्रम घेण्यात आला ना काँग्रेसच्या कोणा बड्या नेत्याने त्यांना सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहिली. सकाळी ९.३० वाजता काँग्रस ट्विटह हँडलवरून “नरसिंह रावांचे योगदान देश विसरणार नाही.”, असे “कोरडे” ट्विट करण्यात आलेय.

१० जनपथचा काँग्रेस नेत्यांवर एवढा धाक आहे, की न जाणो आपण एखादे ट्विट आपण केले आणि १० जनपथमधील कोणाच्या ते दृष्टीला पडले तर…!! आपल्यावर १० जनपथची वक्रदृष्टी पडेल या भीतीने कोणी नरसिंह रावांना श्रद्धांजली वाहणारे ट्विट करण्याचे “धाडस” दाखवले नाही. नाही म्हणायला झारखंड काँग्रेसचे ट्विट दिसले.

एवढेच नाही तर आठवतेय का? नेहरू जन्मशताब्दी, इंदिरा गांधी जन्मशताब्दी काँग्रेसने किती धुमधडाक्यात साजऱ्या केल्या होत्या. देशभर उपक्रमांची रेलचेल होती. दोघांच्या नावाने विविध योजना सुरू करून गाजवल्या होत्या काँग्रेसने. शास्त्री जन्मशताब्दीचा तेवढा गाजावाजा केला नव्हता, पण काँग्रेसजनांनी त्यांची जन्मशताब्दी साजरी केली होती. पण नरसिंह राव यांचे “पुण्य” एवढे पुरेसे नव्हते की शास्त्री जन्मशताब्दीचा साधेपणाही त्यांच्या वाट्याला यावा.

पण काँग्रेसने नरसिंह रावांचा वारसा नाकारायचा करंटेपणा दाखविला असला तरी देशाने मात्र तो स्वीकारल्याचे सोशल मीडिया ट्रेंडवरून दिसतेय. इतर पक्षांचे नेते, कार्यकर्ते, अर्थ अभ्यासक यांनी मात्र त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आर्थिक सुधारणा धोरणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. मोदींबरोबर भाजपच्या इतर नेत्यांनी नरसिंह राव यांच्या विषयी आदरभाव व्यक्त केलाय. या ट्विटमध्ये एक ट्विट लक्ष वेधून घेतेय, रणजित सावरकरांचे. ज्या नेहरू – गांधी खानदानाकडून दिवसागणिक सावरकरांचा अपमान होतो, त्या सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी पक्षभेद विसरून नरसिंह रावांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताच्या वेगळ्या राजकीय संस्कृतीची जपणूक केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*